शिवसेना ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा सहसमन्वयक पदी निलेश केसरकर यांची निवड.
प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे )

गोरेगांव – माणगांव तालुक्यातील पहेल या गावचे सुपुत्र युवा उद्योजक निलेश केसरकर यांचा महाड विधानसभा मतदार संघात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहसमन्वयक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
युवा उद्योजक निलेश केसरकर हे नेहमीच सामाजिक कार्य करण्यासाठी तप्तर असतात. अनेक संघटनेसोबत राहून त्यांनी सामाजिक काम केली आहेत. कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुणबी समाजाच्या तरुण मुलांना एकत्रित करुन नवनविन उपक्रम राबविलेले आहेत. त्यांना केवळ सामाजिक कार्याचीच आवड नसून क्रिकेट खेळात देखील त्यांना चांगला रस आहे. क्रिकेट खेळाच्या माध्यमातून देखील त्यांना खेड्यापाड्यातच नाही तर शहरात देखील त्यांंची चांगली ओळख आहे. त्यांच्या याच जनसंपर्काची आणि सामाजिक कार्याची दखल घेत माननीय शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख अनिल नवगणे साहेब यांनी निलेश केसरकर यांची महाड विधानसभा मतदार संघ सहसमन्वयक पदी निवड केली असुन गोरेगाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक विजयराज खुळे (आप्पा) यांच्या निवास स्थानी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा मतदार संघातील नेते हनुमंत तथा नानासाहेब जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ नेते विजयराज खुळे, उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे, माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी अमित मोरे , लोणेरे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, माणगाव उप तालुका प्रमुख मधुकर नाडकर, चंद्रकांत यादव, गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे, गोरेगाव गण संपर्क प्रमुख रोहित रातवडकर, मांजरोणे विभाग संपर्क प्रमुख सचिन खिडबिडे, युवा सेना उप तालुका प्रमुख अक्षय कदम, राजा बिरवाडकर तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व शिवसैनिक बहु संख्येने उपस्थित होते.