लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडच्या वतीने श्री शिवाई मंदिरात आरोग्य शिबिर संपन्न
दर्शनाला आलेल्या भाविकांनी घेतला शिबिराचा लाभ

प्रतिनिधी – किरण बांधणकर ( पेण ) लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड व श्री शिवाई जागृत देवस्थान खारपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जागृत देवस्थान असलेल्या श्री शिवाई देवींच्या मंदिरात लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड जिल्हा आरोग्य विभागाचे प्रमुख शशिकांत भगत यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून देवींच्या दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांनी मोठ्या संख्येत शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. यावेळी रक्तदाब, नाडी परीक्षण मधुमेह, डोळे तपासणी, बीएमआय, सांधेदुखी, हृदय स्वास्थ केस गळणे, गॅस, अपचन, पित्त, त्वचा विकार या आरोग्य विषयक तपासणी करिता डॉक्टर प्रवीण शिंदे, डॉक्टर सुनील अहिरे, आरोग्य सल्लागार अवधूत कोरे, अंकुश शितप, योगेश चौखले, प्रथमेश नारकर, आकांक्षा अंगारखे, पुनम जाधव, जोसंग चव्हाण, पांचाळ यांनी शिबिरा प्रसंगी काम पाहिले तसेच यावेळी पेण तसेच खारपाडा येथे लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडच्या वतीने आरोग्य विषयक कार्यक्रम घेण्यात आले असून चिंचपाडा येथे नेत्र चिकित्सा केंद्र सुरु करण्यात आले आहे तर पेण येथे लायन्स क्लबचे हॉस्पीटल बांधण्याचा मानस असल्याचा डिस्ट्रिक्ट हेल्थ लायन शशिकांत भगत यांनी सांगितले.
याप्रसंगी डिस्ट्रिक्ट हेल्थ लायन शशिकांत भगत, अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष प्रमोद पाठक, विश्वास पाटील, अशोक भगत, हेमंत भगत, प्रशांत भगत, सचिव राजेश मुळे, खजिनदार वीरेंद्र पटेल आदी लायन्स क्लब पदाधिकारी सदस्य उपस्थित होते तसेच शिबीर संपन्न करण्यासाठी स्टोन क्रशर वेल्फेअर असोसिएशन व युवराज स्टार ग्रुप यांचे विशेष सहकार्य लाभले.