चिरनेर – मोठे भोम येथे जेनेरिक आधार जनरल स्टोर चे युवा उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात गोर गरीब रुग्णांसाठी अल्पदरात औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी मोठे भोम गावातील कु.अक्षय नरेश पाटील व कु. साक्षी नरेश पाटील या तरुणाने जेनेरिक आधार चे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावा जवळील मोठे भोम येथील बस स्थानका जवळ जेनेरिक आधार च्या माध्यमातून एन एस फार्मसी आणि जनरल स्टोर या मेडिकलची उभारणी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर केली. त्याचा शुभारंभ भारताचे युवा उद्योजक, जेनेरिक आधार चे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आला.
२०१९ साली जेनेरिक आधार या औषधाची देवाणघेवाण करणाऱ्या कंपनीची स्थापना करण्यात आली असून उरण परिसरातील ग्रामीण भागातील गोर गरीब रुग्णांसाठी अल्पदरात औषधे उपलब्ध व्हावी यासाठी मोठे भोम गावातील नरेश सावळाराम पाटील, निता नरेश पाटील याचे सुपुत्र कु. अक्षय नरेश पाटील व कु. साक्षी नरेश पाटील यांनी मोठे भोम गावातील बस स्थानका जवळील आई काँम्प्लेक्स येथे जेनेरिक आधार च्या माध्यमातून एन एम फार्मसी आणि जनरल स्टोर या मेडिकलची उभारणी केली. या ठिकाणांहून विविध दुर्धर आजारावरील जेनेरिक औषधे अत्यंत अल्पदरात उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील युवा तरुण साक्षी व अक्षय या बहिण भावाने गोर गरीबांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर राहातील असा विश्वास जेनेरिक आधार चे संस्थापक अर्जुन देशपांडे यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ प्रकाश मेहता, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, आधार चे रितेश सावळे, काँग्रेस पक्षाचे तालुका तथा तिरंगा पतपेढीचे उपाध्यक्ष घनश्याम पाटील, माजी सरपंच अविनाश म्हात्रे, अरुण ठाकूर, विकास भोईर, अर्जुन मोकल, शिवधन पतपेढी चेअरमन गणेश म्हात्रे, नाथा नारंगी कर, पंकज ठाकूर, माजी सरपंच श्रीधर पाटील, पोलीस पाटील श्याम पाटील, विकास पाटील, पोलीस पाटील उलवे जनार्दन पाटील, उद्योजक एन डी भोईर, ग्रामपंचायत सदस्या भारती मनोहर पाटील, प्रभाकर पाटील, एच एन गावंड, सतीश पाटील, धर्मेंद्र म्हात्रे, महेंद्र ठाकूर सह इतर मान्यवर उपस्थित होते.