रा. जि. प उर्दू शाळा पुरार वनी येथे मोफत नेत्र तपासणी कार्यक्रमाचे आयोजन
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत आयोजित नेत्र तपासणी उपक्रमाचा विध्यार्थ्यानी घेतला लाभ

प्रतिनिधी – मंगेश मोरे ( पुरार ) जिल्हापरिषद सेमी इंग्लिश स्कूल पुरार वनी ही पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे मात्र येथील उर्दू मराठी व इंग्रजी भाषेतील उत्तम श्रेणी शिक्षणामुळे ही शाळा पुरार वनी तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकप्रिय शाळा ठरत आहे. येथील विध्यार्थ्यांच्या शिक्षणा व्यतिरिक्त अनेक उपक्रम राबविले जातात… विध्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यादृष्टीने विशेष काळजी घेतली जाते. विध्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असेल तरच ते शाळेत जाऊन उत्तम शिक्षण घेत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहू शकतात. या करिताच जिल्हापरिषद उर्दू शाळा पुरार वनी येथे नेत्र तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड जिल्हापरिषद समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत आर. झूनझूनवला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल च्या वतीने रा. जि. प. उर्दू शाळा पुरार वनी येथे मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व शास्त्रक्रिया उपक्रम राबविण्यात आले. यावेळी पहिली ते चौथी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली, नेत्र तपासणी करून चषम्यांची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच कोणाला ही गंभीर दृष्टीदोष नसल्याने शस्त्रक्रिया ची गरज नाही आहे, मात्र गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया साठी आर झूनझूनवला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे संपर्क करावे असे सुचवण्यात आले.
यावेळी नेत्र तपासणी तज्ञ् यश सावंत व मुसीम सय्यद यांनी केली तसेच तपासणी साठी मुख्याध्यापक शब्बीर अधिकारी, शिक्षिका शबनम पठाण, आफताब शेख, फैयाज जोगिलकर, फर्याला पोटे व कर्मचारी सर्व सहकार्यासाठी उपस्थिती होते.