शिवसेना उ. बा. ठा. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांच्या वाढदिवस निमित्त ब्लँकेट व शालेय पॅड वाटप
प्रतिनिधी -संतोष उध्दरकर ( म्हसळा )

म्हसळा दि. ९/१/२०२५ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसळा ग्रामीण रुग्णालय येथे गरजु रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच न्यु इंग्लिश स्कुल नेवरुळ येथील शालेय विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी लागणारे पॅडचे देखील वाटप करण्यात आले, देहा कडुन देवा कडे जाताना समाज लागतो त्याचे आपण देणेकरी आहोत या भावनेने आज शिवसेनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे असे जेष्ठ शिवसैनिक व हायस्कूल चे चेअरमन रविंद्र लाड यांनी विदयार्थ्यांना मार्गदशनात सांगितले,
सदर कार्यक्रम कौस्तुभ करडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला, यावेळी उपस्थित स्कुल चेअरमन रविंद्र लाड,युवा तालुका अधिकारी कौस्तुभ करडे.शहर प्रमुख विशाल साईकर, उप.तालुकाप्रमुख हेमंत नाक्ती, कृष्णा म्हात्रे, जेष्ठ शिवसैनिक शंकर कासार,जेष्ठ शिवसैनिक नरेश विचारे,अंकुश नटे, जुनेद अधिकारी,सलीम फणसे,आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.