अनिरुद्ध उपासना केंद्र उरण आणि मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन
१६४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे ( उरण ) रक्ता अभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून अनिरुद्ध उपासना केंद्र उरण आणि मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद शाळा, पेन्शनर्स पार्क, उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदानाविषयी जनजागृती करत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा, जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला असून या रक्तदान शिबिरास २०० व्यक्तींची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १६४ व्यक्तींचे रक्त स्वीकारण्यात आले. अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला एस एल रहेजा ब्लड बँकेचे महत्वाचे सहकार्य लाभले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्रच्या सर्व पदाधिकारी,सदस्यांनी, भाविक भक्तांनी विशेष मेहनत घेतली.