
उरण – न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्दीतील तुकाराम हरी वाजेकर येथे उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी / विद्यार्थिनी व शिक्षक यांना मानवी हक्क दिनानिमित्त समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबाबत जनजागृती करिता पोलीस प्रशासनातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या जनजागृती कार्यक्रमा वेळी म.स.पो.नी मोनाली चौधरी. (गुन्हे), म.पो.उप निरी. अश्विनी कांबळे यांनी मानवी हक्का बाबत माहिती दिली. मानवाचे हक्क, पोलीस दलाची माहिती त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा व गुन्हे प्रतिबंध,व्यसन मुक्ती व अंमली पदार्थ प्रतिबंध, आर्थिक फसवणूक व प्रतिबंधक उपाय,जेष्ठ नागरिक सुरक्षा व काळजी, मुली, महिला व बालकाची सुरक्षा, महिलांच्या विरोधातील घटना आदी संदर्भात पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली शिवाय नवी मुंबई पोलीस व्हॉट्सअप चॅनल फॉलो करण्यास सांगितले तसेच नागरिकांच्या मदतीसाठी असणाऱ्या डायल ११२ व साइबर फ्रॉड हेल्पलाईन १९३० क्रमांकाची माहिती देऊन त्याचा प्रसार नागरिकांमध्ये करावा याची माहिती देखील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी मनोहर म्हात्रे ( प्राचार्य ), वैजनाथ कुटे. ( ज्यु कॉलेज प्रमुख ), दर्शना माळी ( उप शिक्षिका ) तसेच विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते.