Join WhatsApp Group
आपला जिल्हा

घर घर संविधान’ माणगाव तालुक्याचा आदर्श पॅटर्न बनावा  – गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट

प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे/माणगांव )

माणगाव – भारतीय संविधान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा प्रतिष्ठापूर्वक तथा सन्मानजनक जीवन जगण्याचा आधार आहे. भारतीय संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असून त्यात आपला देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व देशातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. संविधान हे एक जीवंत दस्तावेज असून ते देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका निभावते. असे महत्वपूर्ण दस्तऐवज त्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घराघरात जाऊन त्याचे मूल्य प्रत्येकाला कळावे, म्हणून शासनाने घर घर संविधान’ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यासंदर्भात १० ऑक्टोबर रोजी एक निर्णय निर्गमित केला आहे. त्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी माणगाव तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये करण्यात येऊन घर घर संविधान’ हा उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे प्रतिपादन श्रीमती सुरेखा तांबट गटशिक्षणाधिकारी माणगाव यांनी घर घर संविधान ह्या उपक्रमाबाबत 12 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान केले.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात माणगाव तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व साधन व्यक्तींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ‘घर घर संविधान’ ह्या उपक्रमाबाबत माणगाव तालुक्याचा एक आदर्श पॅटर्न बनवण्यासाठी विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. या दरम्यान तीन नाविन्यपूर्ण उपक्रम चालू शैक्षणिक वर्षात राबविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधील सर्व शिक्षकांना दोन टप्प्यांत संविधानाविषयी मार्गदर्शन केले जाईल. हे मार्गदर्शन मिळालेले शिक्षक आपापल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व विद्यार्थी आपापल्या परीने घरी ऐकलेले सांगतील.

घर घर संविधान याबाबतीत येत्या १८ तारखेला दोन सत्रात संपूर्ण तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शालेय परीपाठात दररोज प्रास्ताविका वाचन केले जाते. परंतू त्याचा अर्थ सर्वांना समजतोच, असे नाही. अशा वेळी प्रास्ताविका वाचनानंतर त्यातील प्रत्येक शब्दाचा संविधानातील अनुच्छेदानुसार अर्थ सांगणाऱ्या एक मिनिटांच्या लेखमालेचे दररोज वाचन केले जाईल व नंतर ती पोस्ट सर्व पालकांच्या गृप वर पाठवण्यात येईल. यासंदर्भात १८ तारखेच्या शिक्षक मार्गदर्शनावेळी सर्वांना सुचना देण्यात येणार असून येत्या १९ तारखेपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सत्रसमाप्ती पुर्वी जे वरील दोन उपक्रम घेतले जाणार आहेत, त्यांची फलश्रुती तपासण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व इच्छुक पालकांची एक चाचणी घेतली जाईल.

उपरोक्त उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गटशिक्षणाधिकारी मॅडमांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर एक घर घर संविधान समिती स्थापन करण्यात आली असून त्यात कुमार खामकर, धुळदेव कोळेकर, शंकर शिंदे व नुरखॉं पठाण यांचा समावेश आहे तसेच या समितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती व अंमलबजावणी संपूर्ण तालुक्यातील संबंधित शाळा, विद्यार्थ्यांकडून करून घेण्याची जबाबदारी सर्व केंद्र प्रमुख व साधन व्यक्तींवर सोपविण्यात आलेली आहे. घर घर संविधान ह्या शासन निर्णयानुसार अशी नाविन्यपूर्ण उपक्रमांनी अंमलबजावणी करणारा माणगाव हा राज्यातील एकमेव तालुका ठरून तो राज्याला मार्गदर्शक ठरावा, अशी अपेक्षा यावेळी श्रीमती सुरेखा तांबट, गटशिक्षणाधिकारी माणगाव यांनी व्यक्त केली.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये