
माणगाव – २ ऑक्टोंबर २४ रोजी खारघर घरत क्रिकेट मैदान येथे झालेल्या एक दिवसीय सामन्यामध्ये फायटर क्रिकेट ॲकॅडमी माणगाव संघाने चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी नवी मुंबई या संघावर ४८ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला त्यामुळे माणगाव क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
नाणेफेक जिंकून माणगाव संघानी प्रथम फलंदाजी करत ४० षटकात २५९ धावा केल्या होत्या. या २६० धावांचा पाठलाग करताना खारघर नवी मुंबई संघाचा डाव 200 धावांवर आटोपला. माणगाव संघाकडून अथर्व खांडेकर यांनी १०१ धावांची नाबाद खेळी केली तसेच लक्की करदेकर यांनी ३५ तर साई भिलारे यांनी ४१ धावांची खेळी केली.
गोलंदाजी मध्ये माणगाव संघाकडून आरुष जाधव याने चार बळी मिळवले तसेच ऋग्वेद जाधव यांनी दोन तर पार्थ मस्के आणि तेजस मोहिते यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. हा संघ अतिशय मेहनत घेऊन सराव करीत आहे. या विजयी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.