गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान समुद्रात नीलकमल नावाची खाजगी बोट बुडाली ; दुपारी ३:४५ ची घटना
स्पीड बोट ने जोरदार धडक दिल्याने झाला अपघात ; बोट मधील ११० प्रवाशांपैकी १०८ प्रवाशांची सुटका, दोघांचा मृत्यु

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे ( उरण ) मुंबई समुद्र किनारी असलेल्या गेट वे ऑफ इंडिया ते इलिफंटा या मार्गे समुद्रातून प्रवास करणारी नीलकमल या खाजगी बोटला आज दुपारी ३:४५ च्या सुमारास एका स्पीड बोटीने अचानकपणे जोरदार धडक दिल्याने प्रवाशी बोटीत पाणी शिरुन नीलकमल ही खाजगी बोट समुद्रात बुडाली. या बोटीत एकूण ११० प्रवाशी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या बोटीत प्रवास करणाऱ्या ११० प्रवाशांपैकी १०८ प्रवाशांची हेलिकॉपटरने तसेच नौदल, कोस्ट गार्ड आणि स्थानिक बोटींच्या मदतीने वाचविण्यात यश आले असून या अपघातात २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
मुंबई समुद्र किनारी असलेल्या गेट वे ऑफ इंडिया ते इलिफंटा ( घारापुरी -तालुका उरण ) या मार्गे समुद्रातून प्रवास करणारी नीलकमल या खाजगी बोटला आज दुपारी ३:४५ च्या सुमारास एका स्पीड बोटीने जोरदार अचानकपणे धडक दिल्याने प्रवाशी बोटीत पाणी शिरले. पाणी शिरल्याने प्रवाशी बोट समुद्रात बुडाली. या बोटीत शंभर हून अधिक प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली असून भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या (नेव्ही )स्पीड बोटी वरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. बोटीतील प्रवाशांपैकी १०८ प्रवाशांना हेलिकॉपटरने तसेच नौदल, कोस्ट गार्ड आणि स्थानिक बोटींच्या मदतीने वाचविण्यात आले असून इतर बेपत्ता प्रवाशांचा शोधकार्य सुरु आहे. या संदर्भात नीलकमल या खाजगी बोटीचे मालक श्री. पडते यांनी सांगितले की एका स्पीड बोट मुळे सदर घटना घडली आहे. स्पीड बोट ही प्रवाशी बोटीच्या आजूबाजूला फिरत होती व थोडया वेळात स्पीड बोटने प्रवाशी बोटला जोरदार धडक दिली त्यामुळे ही घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले.