
माणगाव – माणगाव येथील सहकार क्षेत्रातील अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या लोकनेते अशोक दादा साबळे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर यांच्या हस्ते बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले. हि आकर्षक सजावट असलेली रंगीत दिनदर्शिका सर्वांना मोफत देण्यात येणार आहे. त्यावेळी चेअरमन अरुण पवार, व्हाइस चेअरमन तथा नगरसेवक प्रशांत साबळे, संचालक संजय ओसवाल, हेमंत शेठ, व्यवस्थापक मनोज मुंडे, वसुली अधिकारी बाळासाहेब पवार, माजी सरपंच सुनिता धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
हि पतसंस्था रायगड जिल्ह्यात अग्रगण्य म्हणून ओळखली जाते. सुरवाती पासून ही पतसंस्था कायम स्वरुपी नफ्यात असून दरवर्षी नफ्यात वाढ होत आहे. अशी नफ्यात कायम असणारी एकमेव पतसंस्था आहे याचा अभिमान आणि गर्व वाटत आहे. तसेच ही पतसंस्था सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात मोठं अर्थिक योगदान देत असते. कायम स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी या पतसंस्थेचे नावलौकिक आहे. लोकनेते अशोकदादा साबळे यांच्या स्मृती कायम स्वरुपी लोकांच्या ह्रदयात रहाव्यात आणि सामान्य माणसांची अर्थिक प्रगती व्हावी, यासाठी चेअरमन अरुण पवार, व्हाइस चेअरमन प्रशांत साबळे आणि संचालक मंडळ सातत्याने प्रयत्न करीत असतात हे काम अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर यांनी काढले.