१९९४ – ९५ नेवरुळ स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांकडून नेवरुळ शाळेला प्रवेशव्दार व सि. सि. टीव्ही संच भेट
पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) म्हसळा तालुक्यातील नेवरुळ गांवातील न्यू इंग्लिश स्कुल, नेवरुळ या शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून प्रवेशद्वार आणि सि. सि. टिव्ही संच भेट देण्यात आला आले होते या मुख्य प्रवेश द्वार व सि. सि. टिव्ही संचाचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे म्हसळा पोलिस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांच्या हस्ते मुख्य प्रवेश व्दाराचे फित कापुन व टिव्ही संचाचे कळ दाबुन उद्घाटन करण्यात आले.
मुख्य प्रवेश व्दार हे या शाळेचे माजी चेअरमन व समाज अध्यक्ष गोविंद लटके, माजी सल्लागार महादेव दिवेकर तसेच दत्ताराम कासार यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजिव दत्ता शेठ लटके, सुनिल दिवेकर, नयन कासार यांनी दिला तर लहान प्रवेश व्दार संजय लटके यांनी त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ भेट स्वरुपात दिला, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याने या गोष्टींचा विचार करत याच शाळेत १९९४ – ९५ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एक पाऊल पुढे टाकत या शाळेतील विद्यार्थी यांच्या संरक्षणासाठी शाळेला सि. सि. टिव्ही संच भेट देऊन एक उत्तम उपक्रम राबवुन एक आदर्श निर्माण केला आहे. या साठी शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थी यांचा प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना संदीप कहाळे यांनी माजी सर्व विद्यार्थी यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व प्रत्येक विद्यार्थ्यांनी असाच आदर्श निर्माण करावा, तसेच शाळेचे चेअरमन रविंद्र लाड यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले, समाज प्रेरित करतांना प्रभु श्री राम सारखे आदरणीय असतात आणि आज देखील कर्णा सारखे दाते इथे आहेत म्हणुन अशा प्रकारची चांगली कामे होत आहेत. यावेळी या कार्यक्रमात १९९५ चे सर्व शिक्षक उपस्थित राहुन या सर्व शिक्षकांना देखील गहिवरून आले कि आम्ही दिलेले शिक्षण व्यर्थ गेले नाही, आज आम्हाला खूप आनंद होत आहे कि हे सर्व विद्यार्थी आमच्या हातुन शिक्षण घेऊन घडले आहेत अशी प्रतिक्रिया या सर्व शिक्षकांनी कार्यक्रम ठिकाणी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवळेकर सरांनी केले तर प्रस्तावना मिणेकर सर यांनी केले.
या वेळी उपस्थित पोलिस उपनिरीक्षक संदीप कहाळे, शाळेचे चेअरमन रविंद्र लाड, फकिर सर, सावंत सर, यादव सर, पाटील सर, शंकर कासार, ग्रामसेवक योगेश पाटील, पाभरा मुख्याध्यापक मंगेश कदम, दत्ता शेठ लटके, सुनिल दिवेकर, शंकर कासार, संजय लटके, संतोष लाड, मुख्याध्यापक मिणेकर सर, शांताराम घोले, दताराम महाडिक, सुजित काते, संदीप कार्लेकर, श्वेता जाधव, मोहन कापडी, मोरे तसेच सर्व माजी विद्यार्थी व पंचक्रोशितील सर्व पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.