Join WhatsApp Group
आपला जिल्हा

माणगाव येथील बायपासचे काम बंद ; मुंबई गोवा महामार्गाला साडेसाती

लोकप्रतिनिधींची उदासीनता कि ठेकेदारांनी केले पलायन ?

प्रतिनीधी – अरुण पवार ( माणगाव ) रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मुंबई गोवा महामार्गाचे अद्यापही रखडलेल्या अवस्थेत आहे. तसेच ठिकाठिकाणी बायपास, उड्डाणपूल, पुल, मोऱ्यांची कामे रखडली आहेत. महामार्गाचे काम पावसाळ्यापासून बंद आहे तर काही ठिकाणी रस्त्याची बांधकामे मुंगीच्या पावलांनी सुरू आहेत. त्यातच काही ठेकेदार काम बंद ठेवून पळून गेल्याचे बोलले जात आहे, काही ठिकाणी वन विभागाने महामार्गाला हरकती घेतल्या आहेत. तसेच जमिनीचे हस्तांतरण, मोबदला, फसवणूक, भावकी, गावकी, वादंगामुळे न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. निधीची वानवा, खड्डे, वाहतुकीची कोंडी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींची कमालीची उदासीनता दिसून येत आहे. या व अशा अनेक कारणांमुळे महामार्गाला अडथळ्यांची साडेसाती लागलेली आहे. त्यामुळे हा महामार्ग पुर्ण होण्यासाठी वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

उत्तर रायगड जिल्ह्यातील महामार्गाचे काम विविध आंदोलने आणि जनतेच्या रेट्यामुळे कसेबसे घाई गडबडीत तात्पुरते झाले आहे. मात्र नागोठणे, रातवड, इंदापूर, माणगाव, काळ नदी, गोद नदी आणि लोणेरे येथील पुलांची बांधकामे दोन वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सुमारे २५ अरुंद मोऱ्यांची बांधकामे सुरूच झालेली नाहीत. दरम्यान वेळेत काम पूर्ण न केल्याने ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर मनुष्य वधाचा गून्हा दाखल करुन अटक करण्यात आली. या कारवाईमुळे काही ठेकेदार काम बंद ठेवून पळून गेले. त्यामुळे पुन्हा एकदा या कामांची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांनी दिली.

१७ वर्षांपासून हा महामार्ग रखडला गेला आहे त्यामुळे खड्डे आणि वाहतुकीची कोंडी आदी समस्यांना प्रवासी आणि पर्यटक यांना तोंड द्यावे लागत आहे. हजारोंच्या संख्येने अपघातात नाहक बळी गेले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत तसेच कोकण रेल्वे आणि महामार्ग कार्यालय यांच्या मधील वादाने काम थांबले आहे. तेथे कोकण रेल्वेचे दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. रेल्वेच्या मार्गावरुन गर्डर टाकताना रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्याची विनंती धुडकावून लावली होती. तेव्हापासून बायपासचे काम बंद आहे.  हा महामार्ग साडेसातीच्या फेऱ्यात अडकला आहे तरीही हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणीही प्रयत्नशील नाही याकडे लक्ष दिले जात नाही. हा प्रश्न अतिशय संवेदनशील असूनही लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. याचे सर्वांना नवल वाटत आहे.

सुरवातीला हा महामार्गाचे डांबरीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र अति पाऊस पडत असल्याने या महामार्गाला खड्ड्यातून तारेवरची कसरत करुन मार्ग काढत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे डांबरीकरण रद्द करुन काँक्रीटीकरण करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी मंजुरी आणली. दरम्यान याचेही घाईघाईने कामं केल्याने हा मार्ग काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे आधीच उल्हास त्यातून पडला पाऊस अशी दैन्यावस्था झाली.

हा मार्ग पुर्ण होत नसल्याने रोजगार, व्यवसाय, पर्यटन, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण यावर दुरगामी परिणाम होऊन कोकण पर्यायाने रायगड जिल्हा ५० वर्ष मागास राहीला आहे. येथील बहुतांशी तरुण रोजगाराच्या निमित्ताने मुंबई, गोवा, पूणे आणि अन्य राज्यांत नोकरीसाठी पलायन करत आहे. याचे कोणालाही सोयरे सुतक नाही असे खेदाने म्हणावे लागते. याबाबत खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांनी प्राध्यान्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना कधी यश येईल ते त्यांनाही सांगता येत नाही. तोपर्यंत जनतेने खड्डे, वाहतुकीची कोंडी वाढतच जाणार आहे आणि नरकयातना भोगाव्या लागणार आहेत अशा उद्विग्न प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये