सानपाडा, नवी मुंबई येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.
प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – सानपाडा, नवी मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पारस काव्या कला जनजागृती संस्थेच्या १४ व्या वर्धापन दीना निमित्तने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना महाराष्ट्रातील १०८ युवा युवतीना २०२४ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यापैकी नेहा विशाल पाटील रा. बोरखर हिला क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे क्रिडारत्न पुरस्कार देण्यात आला तर हर्षद वसंत पाटील वावंजे पनवेल यांना क्रिडा क्षेत्रातील चांगले विध्यार्थी घडविल्या मुळे त्यांना क्रिडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच गोपाळ दिनकर म्हात्रे सारडे उरण यांना आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. या वेळी मंगेश चांदिवडे संस्था अध्यक्ष, शोभा चांदीवडे खजिनदार, दामोदर बेडेकर सचिव, सुरेश शेंडेकर समाज सेवक पुंडलिक म्हात्रे साहित्यिक, संजय बर्वे साहित्यिक, शंकर गोपाली हे मान्यवर उपस्थित होते.