नव वर्षच्या स्वागतासाठी हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर बिच पर्यटकांनी हाऊसफुल
नशा करून वाहने चालवु नका म्हसळा पोलीसांकडून जागोजागी सुचना फलक

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर. ( म्हसळा ) ३१ डिसेंबर २०२४ ला बाय बाय करण्यासाठी व नव वर्षाच्या स्वागतासाठी हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन बीच हाऊसफुल झाले असून पर्यटकांनी जास्त करून या ठिकाणी येण्याची पसंती दिल्यामुळे स्थानिक व्यवसायिकांना, तसेच समुद्र लगतच्या व्यवसाईकांचा व्यवसाय तेजीत असल्याचे दिसुन येत आहे,
पर्यटकांचा वाढता उत्साह पाहता, पर्यटकांची व स्थानिक नागरीकांची सुरक्षितता महत्वाची दिसुन येत असल्याने म्हसळा पोलिस ठाण्याच्या वतीने शहरात नशा करून वाहने चालवु नका या संदर्भात ठिकठिकाणी सुचना फलक लावण्यात आले आहेत, नशा करून वाहने चालवित असाल तर कायदेशीर कारवाई होणार, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, म्हसळा या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडुन स्थानिक नागरिकांना मारहाण करण्यात आली होती, या मुळे स्थानिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे, आणि सर्व वाहने म्हसळा बाह्य मार्गाने जात असताना अनेक वेळा छोटे, मोठे अपघात होत आहेत याच गोष्टीची खबरदारी म्हणुन सर्व ठिकाणी नशा करून वाहने चालवु नका या प्रकारे सुचना फलक लावण्यात आली आहेत
————————————–
म्हसळा पोलिस ठाण्याच्या वतीन राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग लगतच्या सर्व ग्रामपंचायत यांना आवाहन करण्यात येत आहे कि त्यांनी देखील अशा प्रकारे सुचना फलक लावणे गरजेचे आहे, तसेच येणाऱ्या पर्यटकांना देखील सांगणे आहे कि पर्यटनासाठी या आनंद लुटा, आनंदाने आपली सुट्टी साजरी करा. पण नशा करून वाहने चालवु नका,धुमस्टाईल वाहने चालविल्यास, तसेच पर्यटकांनी धुडगुस घातल्यास, आणि कायद्याचे भंग केल्यास त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. स्थानिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे वागु नका.
संदिप कहाळे
पोलीस उप निरिक्षक
म्हसळा पोलीस ठाणे.