जानसई संवर्धन ( हिंगुलडोह ) प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरुवात; मंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्प
म्हसळेकरांचे श्रद्धांस्थान असलेले हिंगुलकर्णी मातेचे स्थान, निसर्गरम्य ठिकाण, म्हसळेकरांना व पर्यटकांना आनंद देणारे ठिकाण म्हणुन विकसीत होणार - खा. सुनिल तटकरे

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) जानसई संवर्धन हिंगुलडोह सुशोभिकरण प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून खा. सुनिल तटकरे यांनी कामाची पाहणी केली, यावेळी सर्वप्रथम तटकरे यांनी म्हसळेकरांचे श्रध्दास्थान असलेले हिंगुलकर्णी आईचे दर्शन घेऊन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कडुन कामाचा आढावा घेतला, मंदिर कसे व किती बाय कितीचे असणार आहे, विसर्जन घाट कुठे असणार आहे ? प्रकल्प कुठ पर्यंत आहे ? मुख्य म्हणजे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाय करणार आहात ? याची सविस्तर माहिती खा. सुनिल तटकरे यांनी घेतली.
यावेळी बोलताना खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले कि जानसई संवर्धन प्रकल्प हा मंत्री आदितीताई तटकरे व अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतुन तयार होत असलेल्या प्रकल्पाचे पहिल्या टप्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो असता या कामासाठी रिटन विभागाकडुन पाच कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. हा परिसर पूर्ण स्वच्छ व्हावा, सुशोभिकरण व्हावा, सकाळ, संध्याकाळ विसाव्या साठी, पर्यटनासाठी ठिकाण निर्माण व्हावा असा आमचा प्रयत्न आहे, तसेच दुसऱ्या टप्यात पाभरा फाटा नदी प्रवाह सातशे मिटर पर्यंतचा टप्पा आहे त्या संदर्भात देखील आराखडा तयार करण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत, पुढील एक ते दिड वर्षात प्रकल्प पूर्ण करून म्हसळेकरांना व पर्यटनासाठी आनंद घेण्यासाठी निसर्गरम्य ठिकाण विकसित होऊ शकेल.
यावेळी तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उप नगराध्यक्ष संजय दिवेकर, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, पोलीस उप निरीक्षक संदीप कहाळे,नगरसेवक सुनिल शेडगे, निकेश कोकचा, जि.प. माजी पशु संवर्धन सभापती बबन मनवे, पत्रकार अशोक काते, पत्रकार उदय कळस, म्हसळा टाईम्सचे रमेश पोटले, निलेश मांदाडकर, भालचंद्र करडे, भाजप तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील, शैलेश पटेल, मधुकर गायकर, रियाज घराडे, डॉ. जलाल, बिलाल कौचाली, लहु म्हात्रे, प्रकाश गाणेकर, स्नेहल घोले, विशाल साळुंखे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.