Join WhatsApp Group
ताज्या घडामोडी

श्री सांकशी गडावर सापडल्या शिवकालीन शिल्प मुर्ती

प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगांव )

माणगाव – रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन तीन शिल्प मुर्ती सापडल्या आहेत. या मुर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. या शिवकालीन मुर्ती सापडताच श्री शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या धारकऱ्यांना मिळाल्याने त्यांचा आनंद आणि उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. हे सेवेकरी आणि धारकरी शिवभक्त गेली अनेक वर्षे गड संवर्धन मोहीमा राबवून विविध गड किल्ले यांची साफसफाई करून आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करीत असतात.

शिवछत्रपतींनी गडकोटांचा वारसा आपल्याला दिलाय तो जपण्यासाठी हे आचरण करुन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मागील चार वर्षापासून श्री सांकशी गडावर निरंतर गड संवर्धन मोहिमा होत आहेत. या मोहिमेच्या कार्याची पोचपावती म्हणून यंदा कार्य करताना ३ पुरातन मूर्त्या धारकऱ्यांना सापडल्या. या गड संवर्धन मोहिमेत पेण, पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातून देखील अनेक धारकरी, सेवेकरी गड संवर्धन मोहिमेत सहभागी होत असतात.

रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची श्री सांकशी गडावरील ४७ वी मोहीम राबवत असताना गडावरील पाण्याचे टाके साफ करताना पाण्याच्या टाक्यात श्री महादेवाची पिंड, भग्न अवस्थेतील नंदी महाराज आणि हातात धनुष्य बाण घेतलेली गड देवतेची मूर्ती अशा ३ पुरातन मूर्त्या टाक्यातील गाळ काढताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना सापडल्या. आजपर्यंत गडावर ४६ संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. त्यामधे गडावरील दगड, माती, गाळ याने भरलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात धारकरी बंधूंना यश मिळाले आहे. परंतु आजची मोहीम ही झालेल्या सर्व गड संवर्धन मोहिमांचा आनंद द्विगुणित करणारी आणि सर्वांना शिवकाळात घेवून जाणारी मोहीम ठरली.

यापूर्वी श्री सांकशी गडावर कोणत्याही देव-देवतेची मूर्ती नसताना धारकरी गडावर गड संवर्धन कार्य चालू करण्यापूर्वी गड देवतेचे स्मरण करुन गडाला श्रीफळ, पुष्पहार वाहून पूजा करत होते आणि प्रत्येक जण गडाच्या गड देवतेला साकडं घालत होते. गड संवर्धन कार्य करणाऱ्यांना शक्ती आपल्या कार्याला यश दे तसेच ज्याप्रमाणे शिवकाळात, मागच्या काळात आपल्या मावळ्यांनी, पूर्वजांनी गडावर आपल्या देव-देवदेवतेची पूजा केली असेल ते भाग्य आम्हाला आजच्या काळात मिळू दे आम्हाला सुद्धा गडावरील देव-देवतांची सेवा करायची आणि पूजा करायचे भाग्य मिळू दे. साक्षात सांकशी गडाच्या गड देवतेने आणि आपल्या भगवंतांनी श्री महादेवाच्या रुपात नंदी महाराजांच्या रुपात गड देवतेच्या रुपात दर्शन दिले असे धारकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर गडावर सर्व देवतांचे अभिषेक घालून पूजा आणि आरती करुन भंडारा उधळून सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये