माणगांव येथे यज्ञेश उभारे यांच्या स्मरणार्थ बॅडमिंटन स्पर्धा संपन्न.
प्रतिनिधी - पदमाकर उभारे ( माणगांव )

माणगांव – माणगांव येथे TWJ यांच्या विद्यमाने तसेच माणगांव स्पोर्ट्स बॅडमिंटन असोशियशन यांच्या संयोजनाने यज्ञेश उभारे यांच्या स्मरणार्थ २९ डिसेंबर २०२४ रोजी माणगांव क्रीडा संकुल येथे भव्य बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा खुला गट व ४५ वर्षावरील गट असे दोन गटातील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती. खुल्या गटात 32 संघांनी सहभाग घेतला होता तर ४५ वर्षावरील गटात १६ संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उदघाट्न माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, माजी नगरसेवक नितीन बामुगडे, डॉ प्राजक्ता उभारे तसेच TWJ चे आकाश कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत खुल्या गटातून तुषार माने व अक्षय भिंगारे ( पनवेल ), प्रथम क्रमांक प्रथमेश गोसावी व ओमकार गोसावी ( माणगांव ), डॉ. भूषण सवादकर व कुलदीप शर्मा ( माणगांव ) हे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाले. तसेच ४५ वर्षावरील खुल्या गटातून संतोष कुंभार व मनिष पाटील, महेश गोसावी व समीर आचार्य, सचिन्द्र पाटील व नागेश शिंदे हे प्रथम तीन क्रमांकाचे स्पर्धेत विजयी झाले. सदर स्पर्धा जाधव सर, समीर आचार्य, मगरे सर, गणेश जाधव, महेश गोसावी, ढोले सर, आकाश कोतवाल ( TWJ ) यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात यशस्वी करण्यात आली.