तळा – तळेगांव येथे श्री कोंडजाई देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार, भाविकांनी लाभ घ्यावा.
प्रतिनिधी - किशोर पितळे ( तळा )

तळा – तळा तालुक्यातील तळेगांव येथे श्री कोंडजाई देवी चा वार्षिक उत्सव गुरुवार दि. ९ / १/२०२५ रोजी पौष शुद्ध दशमीला साजरा केला जाणार आहे. तरी या उत्सवात श्री कोंडजाई देवीचे सर्वभक्तगणं, भाविक, उपासक, देणगीदार, कौंडिण्य गोत्र कुटुंबीय यांनी येऊन आई कोंडजाई देवीचा दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
प्रतिवर्षी मोठ्या भक्ति भावाने प्रचंड संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करीत असतात. मनोकामना पुर्ण करणारी भक्तांच्या हाकेला धावून येणारी श्री कोंडजाई देवीचे मंदिर आहे. तळेगांव कोंडी वर रानात असलेली देवी पुर्वीच्या काळी बैलगाडीने काही भाविक येत असत स्थानिक कौडिंण्य गोत्रीय वेदक, समाज बांधव उत्सव साजरा करीत असत काळ बदलत गेला सुविधा होत गेल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा उत्सव जरा केला जावू लागला.
श्री कोंडजाई देवीचे हे मंदीर छोटेसे गवत, पेंढा आच्छादित असलेल्या मंदीराचा सन १९६५ /६६च्या दरम्यान कै. विनायक भाई वेदक कै. तुकाराम लक्ष्मण पोतदार, दत्तात्रय (बंधू) पोतदार, प्रभाकर राघोबा वेदक आणी अनेक सहकारी वेदक व ज्ञाती बांधवांनी मंदिराची पुनर्बांधणीचा विचार करून मंदिर उभारणी केली. भक्तगणांचा वाढता ओघ बघता विश्वस्तांनी पुनर्बांधणीचा विचार करून नव्याने मंदिर बांधले या कामी अनेक भाविकांनी मदतीचा हात पुढे करून मंदीर पुर्ण केले. आज मुंबई, पुणे, ठाणे, सुरत, गुजरात कोकणातून घाटावर माथ्यावरून स्थानीक ग्रामस्थ भाविक भक्तगण या श्री कोंडजाई देवीच्या दर्शनासाठी येतात.
श्री कोंडजाई देवीचे ९ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी तळेगांव येथे वार्षिक उत्सव सादरा करण्यात येणार आहे या उत्सवास सर्व भक्तानी येऊन तळेगांव येथे श्री कोंडजाई देवीचे दर्शन घ्यावे असे जाहीर निमंत्रण श्री देवी कोंडजाई मंदिर ट्रस्ट कडून देण्यात आले आहे.