
उरण – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर पक्षा – पक्षांमध्ये वर्चस्व कुणाचे या वरुन रस्सीखेच होताना सर्वत्र पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, उबाठा गट तर कधी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या पक्षांतुन त्यापक्षात पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. कुणाचे पारडे यात जड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल आणि उरणमध्ये आपली ताकद वाढवताना दिसत आहे.
नुकताच मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात मनसे प्रवक्ते तथा महानगर अध्यक्ष योगेश चिले, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उपजिल्हाध्यक्ष दिपक कांबळी, तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, मनसे पर्यावरण सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत घरत, महिला तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष गणेश तांडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत चाणजे ग्रामपंचायत, उलवे नोड, मोहपाडा येथील असंख्य तरुणांनी मनसेत प्रवेश केला
हा प्रवेश मनसेच्या वाहतूक सेनेचे विधानसभा चिटणीस सतीश पाटील, तसेच मनसेचे उप तालुका अध्यक्ष भालचंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आला असुन दिवसेंदिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडे पनवेल, नवी मुंबई व उरण येथील तरुणांचा कल वाढला असल्याचे बोलले जात आहे.