निवडणुका संपल्या राजकारण थांबवून समाजाला अभिप्रेत असलेला विकास करावा. – आमदार भरतशेठ गोगावले
प्रतिनिधी - किशोर पितळे ( तळा )

तळा – दत्तगुरु सेवा मंडळ त्वष्टा कासार समाज तळा तर्फे श्रीदत्त मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ व १२ डिसेंबर २४ रोजी करण्यात आले होते. यावेळी महाड -पोलादपूर आमदार तथा विधिमंडळ पक्ष प्रतोद मा. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मंदिराचा लोकार्पण करण्यात आले त्यावेळी या मंदिरासाठी ३८ लाख रुपयाची निधी मंजूर करून दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मंदिराला निधी उपलब्ध करून देवू शकलो तसेच ग्रामदेवी श्रीचंडिका माता देखील ६० लाख रुपय रुपये निधी भक्तनिवास उभारणीसाठी दिला असून यापुढे देखील हे ५० लाख रुपये देत असल्याचे त्यांनी आश्वासित केले. त्यापुढे म्हणाले की राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित काम करत आहोत आम्ही तो निधी आणला त्या निधीचे श्रेय हे आम्हीच घेणार ज्यांनी निधी आणला आहे त्याचे श्रेय त्याला दिलेच पाहिजे तुम्ही जर का निधी आणलात तर त्याचे श्रेय जरूर तुम्ही घ्या पण आम्ही केलेल्या कामाचं श्रेय कुणाला ही घेऊ देणार नाही. नगरविकास मंत्री शिंदे साहेब असताना वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर केली आणी निधी उपलब्ध करून ११ कोटीची मंजुरी दिली. निधी कमी पडायला नको वाढीव निधी तळा पाणी पुरवठा योजना १३ कोटी ८१ लाख मंजुरी करून अंतिम टप्प्यात काम जवळपास आले असेल माझ्या या शूर मावळ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी मागितला आणि ते पूर्ण होईल त्यामुळे ह्याच श्रेय हे आमचें आहे.
आपण महायुतीतआहोत. नगरपंचायतीत सत्ता पालट झाली. आता आपण काम करायचे आहे निवडणुका संपल्या विकासात राजकारण थांबवून समाजाला अभिप्रेत असलेला विकास करावा असे आवाहन केले. मा. अदितीताई या मतदार संघाच्या आमदार आहेत. या पुर्वी हि होत्या आणी आजही लाडक्या बहिणीच्या मदतीने आमचे सरकार सत्तेत आले. त्या बहिणींना कदापी विसरून चालणार नाही. माझा मतदारसंघ नसताना मी निधी मंजूर करून विकास केला. कर्ता करवीता तोच आहे मी फक्त नाममात्र आहे. देवासाठी धार्मिक कार्यासाठी मदत देत आहे. मा. अदितीताई या मतदार संघाच्या आमदार आहेत. विकासनिधी आणून विकास केला जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे कोअर कमीटी सदस्य लिलाधर खातू तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहरप्रमुख राकेश वडके, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, श्रीराम कजबजे, डॉ.सतीश वडके नगरसेवक नरेश सुर्वे, सिराज खाचे, मंगेश पोळेकर आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.