आज माणगावात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निषेध आंदोलन.
प्रतिनीधी - नरेश पाटील ( माणगांव )

माणगाव – आज माणगांवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपवाक्य वापरून अपमानित केल्याबद्दल माणगांव हाय वे बस स्थानकासमोर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपवाक्य वापरून अपमान केल्याने याचे पडसाद संपुर्ण देशभर उमटताना दिसत आहेत. याच्याच निषेधार्थ आज माणगाव तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता एसटी स्टँड समोर हाय वेला निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
पक्षाच्या वरिष्ठ आदेशाप्रमाणे सदर निषेधार्थ अंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, वरिष्ठ नेते, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते व शिवसेना अंतर्गत संघटनांचे पदाधिकारी, शहरप्रमुख व शहरातील पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होऊन निषेथ नोंदवणार असल्याची माहिती माणगाव ता. प्रमुख गजानन अधिकारी यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.