दिवसा घरफोडी, चोरी करणा-या सराईत चोरास पेण पोलिसांकडुन अटक
प्रतिनिधी - किरण बांधणकर ( पेण )

पेण – पेण पोलिस ठाणे हद्दीतील ठाकुर कॉम्प्लेक्स, चिंचपाडा रोड, सरकारी हॉस्पीटलच्या मागील राहत्या बिल्डींगमधून गेली २० वर्षापुर्वी स्थापन केलेल्या सरस्वतीच्या मुर्तीची चोरी करण्यात आली होती, २६ नोव्हेंबर रोजी सरस्वतीच्या पंचधातुची मुर्ती चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे मा. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व मा. अप्पर पोलिस अधिक्षक अभिजित शिवथरे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पेण पोलिसांना सुचित केले होते. त्याप्रमाणे पेण पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपी याच्या मुसक्या आवळून मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्यादी जगन्नाथ कृष्णा ठाकुर वय ५७ वर्षे रा. ठाकुर कॉम्प्लेक्स, चिंचपाडा रोड, सरकारी हॉस्पीटलच्या मागे पेण ता. पेण जि. रायगड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार., त्यांच्या राहत्या बिल्डींगच्या दर्शनी भागी सरस्वतीची मुर्ती गेले २० वर्षापुर्वी स्थापन केली होती. सदर मुर्ती ही तळमजल्यावर असुन फिर्यादी हे पहिल्या मजल्यावर असल्याने त्यादरम्यान अनोळखी आरोपी याने घराचे तळमजल्यावरील ग्रिलचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेवुन त्यावाटे आत प्रवेश करून ९५,०००/- रु. किंमतीची पंच धातुची सरस्वतीची मुर्ती त्यावर १ किलो २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुलामा दिलेला अंदाजे १५ ते १८ किलो वजनाची मुर्ती चोरी करुन पसार झाला होता. फिर्यादी यानी दिलेल्या तक्रारीनुसार पेण पोलीस ठाणे गुन्हा रजि. ३११/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व मा. अप्पर पोलिस अधिक्षक अभिजित शिवथरे यांच्या आदेशानुसार व पो. उप विभागीय पोलीस अधिकारी सो गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप बागुल पेण पोलीस ठाणे यांच्या सुचनांनुसार पोह/१०४१ राजेंद्र रामचंद्र भोनकर तसेच गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व अमंलदार हे करित होते.
पेण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व अमंलदार सदर गुन्हयाचा तपास रोडवरिल सी. सी.टि.व्ही. फुटेज व गोपनिय माहीतीच्या आधारे कसोशिने तपास करीत सदर गुन्ह्यातील आरोपी विलास चव्हाण वय २० वर्षे रा. आय. टी. आय. कॉलेज जवळची झोपडपट्टी पेण ता. पेण जि. रायगड यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील आरोपीत याने तपासादरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्याच्या ताब्यातुन घरफोडी, चोरी केलेली सरस्वतीची मुर्ती ९५,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीत हा सराईत गुन्हेगार असुन आरोपीत विरूध्द यापुर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) पेण पोलीस ठाणे गु. रजि. नं. ७०/२०२२
भा.द.वि.३२४,३२३,५०४,३४
२)पेण पोलीस ठाणे गु. रजि. नं. २४१/२०२२
भा.द.वि.३९२
३)पेण पोलीस ठाणे गु. रजि. नं. ९२/२०२३ भा.द.वि.३९२
४)पेण पोलीस ठाणे गु. रजि. नं. १११/२०२४
भा.द.वि.४५७,३८०
५)पनवेल पोलीस ठाणे गु. रजि. नं. २२६/२०२०
भा.द.वि.३७९
६)पनवेल पोलीस ठाणे गु. रजि. नं. ३३३/२०२३
भा.द.वि.३७९
सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोसई समद बेग, सहा. फौजदार राजेश पाटील, पोह/१०४१ राजेंद्र भोनकर, पोह/८७३ संतोष जाधव, पोह/८६१ प्रकाश कोकरे, पोह/१५६८ अजिंक्य म्हात्रे, पोह/१४२४ सुशांत भोईर, पोह/८८५ सचिन व्हसकोटी, पोह/११४८ पाटील, पोना/२३१९ अमोल म्हात्रे, पोशि/१९५१ गोविंद तलवारे, पोशि/१२४१ शिंगाडे यांनी केलेला आहे.