म्हसळ्याची चॅम्पियन गर्ल निरजा धोत्रे हिची धडाकेबाज कामगिरी ; राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत पटकावला सुवर्ण पदक
प्रतिनिधी - संतोष उध्दरकर ( म्हसळा )

म्हसळा – दिनांक २९ नोव्हें. २०२४ रोजी धुळे येथे झालेल्या शालेय राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत चॅम्पियन कराटे क्लब म्हसळा (रायगड ) व न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथील विद्यार्थिनी कु. निरजा अंकित धोत्रे हिने आपल्या उकृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळनुन पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जागा प्राप्त केली आहे.
कु. निरजा हिने पेण येथे जिल्हा स्तरीय स्पर्धेत तसेच पालघर येथे विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत धुळे येथे राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत स्थान मिळवले होते. निरजाने धुळे येथे देखील राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत सुध्दा धडाकेबाज कामगिरी करून सुवर्ण पदक मिळवत आपल्या विजयाची घोडदौड कायम राखत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निरजा धोत्रेची निवड करण्यात आली. या धडाकेबाज कामगिरी बद्दल निरजाचे सर्व स्तरातून कौतुक होतांना दिसत आहे.
या यशामागे मुख्य प्रशिक्षक शीहान संतोष मोहिते , प्रशिक्षक सेन्साई अविनाश मोरे व अभय कळमकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच आई वडिलाचे देखील मोलाचे सहकार्य मिळाले. या प्रकारे यशस्वी व धडाकेबाज कामगिरी करणारी म्हसळा तालुक्याच्या इतिहासातील निरजा धोत्रे ही पहिली मुलगी ठरली आहे. तिच्या या यशा मुळे म्हसळा शहराचे तसेच तालुक्याचे नाव उंचावले असून तिचे सर्व स्तरातून कौतुक होतांना दिसत आहे.