वडवली मोहल्ल्यातील एकही शिवसैनिक फुटला नाही, फुटणार नाही – शरिफ हर्गे

गोरेगांव – राज्य भरात विधानसभेच्या निवडणुकाची रणधुमाली सुरु झाली असून उमेदवार आपापल्या विजयासाठी जनतेला अनेक प्रकारचे आश्वासन देत आहेत तर अनेक ठिकाणी सध्या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश, पक्ष फोडीची कामे ही जोर धरु लागली आहेत. त्यातही शिंदे गट आणि ठाकरे गटातच हा प्रकार जास्त पहायला मिळत आहे. महाड विधान सभा मतदार संघात देखील अशाच प्रकारे रस्सीखेच होताना दिसत आहेत. भरतशेट गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप यांच्यातील रंगत अधिक वाढताना दिसुन येत असुन एकमेंकावर आरोप प्रत्यारोप होत आहेत.
काही दिवसांपुर्वी वडवली येथे पक्ष प्रवेश करण्यात आला होता. या प्रवेशानंतर शिंदे गटाला खिंडार, मांजरोणे गणाचे विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाला तडा अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनंतर मांजरोणे गणाचे विभागिय अध्यक्ष शरिफ हर्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे, आणि या बाबत खुलासा करित सांगितले की, वडवली मोहल्ल्यातील शिंदे गटातील एकही शिवसैनिक फुटला नाही, फुटणार नाही..ज्यांनी प्रवेश केला आहेत ते शिंदे गटाचे नसुन राष्ट्रवादी शरद पवार गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे होते.
पुढे सांगताना म्हणाले की, ज्या लोकांनी या अफवा पसरवल्या आहेत, पसरवत आहेत त्यांनी लक्षात घ्या, वडवली माझा गांव नाही, तर श्वास आहे… या गांवाचा मा. कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी विकास केलेला आहे, विकासच नाही केला तर आमच्या गांवावर विश्वास ठेवला आहे, त्यांच्या विश्वासाला माझा गांव ( मोहल्ला ) कधीही तडा जावु देणार नाही. आम्ही मा. भरत शेट गोगांवले यांच्या सोबत होतो, आहोत आणि कायमस्वरुपी त्यांच्या सोबतच राहणार आहोत. त्यामुळे महाड विधानसभा मतदार संघातून मा. भरतशेट गोेगावले यांना आम्ही मतदान करुन चौथ्यांदा विजयी चौकार मारुन विजयोत्सव साजरा करणार हे नक्की आहे.