Join WhatsApp Group
राजकीय

उरणमध्ये तिरंगी लढत होणार ; शेकाप, शिवसेना-भाजप यांच्यात काटे की टक्कर

उरण विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख, ४२ हजार, १०१ मतदार

प्रतिनिधी  – विठ्ठल ममताबादे  ( उरण ) महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाली असून, अर्ज सुद्धा भरून झाले आहे. यावेळी उरण विधानसभा निवडणुकीत २०१९ प्रमाणे भाजप, शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) व शेतकरी कामगार पक्ष यांच्या तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीतही भाजप, शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ), शेकाप यांच्यात चुरशीच्या लढतीचे चित्र दिसत आहे.

उरण मतदार संघात एकूण तीन लाख ४२ हजार १०१ मतदार आहेत. यामध्ये एक लाख ७१ हजार ५२६ पुरुष तर एक लाख ७० हजार ५६३ महिला मतदारांची तसेच १२ तृतीय पंथीयांची नोंद झाली आहे. त्यानुसार २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ७० हजार हुन अधिक मतदारांची नोंद झाली आहे .मागील २०१९ साली झालेल्या निवडणुकीत विजयी अपक्ष, सध्या भाजपचे उमेदवार महेश बालदी यांना ७४ हजार ५४९ तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेनेचे मनोहर भोईर यांना ६८ हजार ८३९ तर शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांना ६१ हजार ६०६ मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर शिवसेनेत विभाजन झाले. मात्र लोकसभा निवडणुकीत शेकाप व शिवसेना (ठाकरे )काँग्रेस आणि इतर पक्षांनी एकत्र येत उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळवून दिले. विधानसभेच्या निवडणुक संदर्भात दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी अर्ज पाठीमागे घेण्याची तारीख होती. मात्र १६ उमेदवार पैकी २ जणांनी अर्ज पाठीमागे घेतले आहेत त्यामुळे उरण विधानसभा मतदार संघात एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल असल्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. समाजमाध्यमाद्वारे जोरात प्रचार सुरू झाला आहे. तर उरणमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच झाल्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. सध्या उरण विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) व भाजप या तीन प्रमुख पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. उरण विधानसभा निवडणुकीत प्रीतम म्हात्रे यांना शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. माजी आमदार मनोहर भोईर शिवसेना ठाकरे गटाकडून, तर महेश बालदी हे भाजपकडून निवडणूक लढवित आहेत.

या निवडणुकीत महिला आणि तरुणांची मते निर्णायक ठरणार आहेत. ते मिळविण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. उरण विधानसभा मतदार संघात एकूण ३५५ मतदान केंद्र असून या मतदार संघसाठी १ हजार ८९३ मनुष्य बळ उपलब्ध करण्यात आले आहे. यावेळी तिरंगी लढतीत काटे की टक्कर होणार आहे. या सर्व घडामोडी मध्ये महिलांची मतेही निर्णायक ठरणार आहेत हे दुर्लक्षुन चालणार नाही.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये