Join WhatsApp Group
मनोरंजन

बिनधास्त खालू बाजा धुमाळ ग्रुप च्या वतीने खालू बाजा स्पर्धेचे आयोजन..

स्पर्धेत तालुक्यातील बारा संघांचा सहभाग; आनंद पायकोळी, मेदंडी संघाचा प्रथम क्रमांक

 प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा )  बिनधास्त खालु बाजा धुमाळ गृप, बोर्ली यांच्या वतीने खालु बाजा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकुण बारा संघ सहभागी झाले होते. स्पर्धा अतिशय चुरशिची झाली. खालुबाज्याच्या आवाजाने उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. परिक्षकांना भाबांवून सोडलेल्या स्पर्धेमध्ये अचुक निर्णय देण्याचे काम पर्यवेक्षक म्हणून लाभलेल्या वनविभागाचे अधिकारी भिवराव सुर्यतळ यांनी केले. त्यांच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करीत समाधान देखील व्यक्त केले.

स्पर्धेच्या बक्षिस वितरणापुर्वी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  या स्पर्धेत प्रथम क्रमांक मेंदडीच्या आनंद पायकोळी यांच्या संघाने पटकावला असून  त्यांना बिनधास्त खालू बाजा धुमाळ गृप च्या वतीने ४४४४ रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच  द्वितीय क्रमांक बिनधास्त खालू बाजा बोर्ली यांनी पटकावले त्यांना ३३३३ रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह तसेच त्रुतीय क्रमांक आगरी खालू बाजा खरसई यांना पटकावला त्यांना देखील २२२२ रु. रोख रक्कम व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ पांगारे संघास देऊन त्यांना देखील गृप च्या वतीने सन्मानित करण्यात आले शिवाय उत्कृष्ट सनई व उत्कृष्ट ढोल यासाठी देखील विशेष बक्षीस देण्यात आले.

याप्रसंगी मंदार तोडणकर यांनी मनोगत व्यक्त करून बिनधास्त खालु बाजा धुमाळ गृप, बोर्ली यांच्या वतीने मयूर धुमाळ, किरण धुमाळ, विनय धुमाळ, कृणाल धुमाळ, शुभम धुमाळ यांनी प्रथमच ही स्पर्धा राबवून छान उपक्रम राबविण्यात आला आहे त्यामुळे आयोजकांचे देखील कौतुक केले तसेच अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून आपली संस्कृती जपली पाहिजे असे देखील तोडणकर यांनी आवर्जून सांगितले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये