शिवसेना तालुका सहसपंर्क प्रमुख पदी वामन बैकर यांची वर्णी
प्रतिनिधी - पांडुरंग माने ( गोरेगाव )

गोरेगांव – गेली अनेक वर्षे शिवसेने सोबत एकनिष्ठपणे काम करीत सेना वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहून काम करीत राहिल्याने कार्यसम्राट आ. भरतशेठ गोगावले यांच्या आदेशाने नागांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंचन श्री. वामन बैकर यांची माणगांव तालुका सहसपंर्क प्रमुख पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
नागांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा आमदार भरतशेट गोगावले यांचे खंदे समर्थक वामन बैकर यांची माणगांव तालुका सहसपंर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असुन शिवसेना गोरेगाव विभागीय संपर्क कार्यालयात रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुणजी चाळके यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी तालुका संपर्कप्रमुख प्रताप घोसाळकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, उपतालुका प्रमुख पंढरीनाथ शेडगे, उपतालुका प्रमुख जगदीश दोषी, गोरेगाव विभाग प्रमुख दिनेश हरवंडकर, जगदीश भोकरे, युवा सेना गोरेगाव विभाग संपर्क प्रमुख ग्रामपंचायत सदस्य रोहित शिंदे, ग्रा पं सदस्या सौ. किशोरी तांबडे, सौ. आस्मिता आंबेतकर, युवा सेना शहर प्रमुख समीर रातवडकर, गोरेगावं उपविभाग प्रमुख मंगेश कदम, रामचंद्र मेस्त्री, उप शहर प्रमुख सज्जाद गोडमे, शैलेश भोजने, सुरेश यादव, रमेश यादव, नागांव शाखा प्रमुख भूपेंद्र कासरेकर, भिंताड शाखा प्रमुख सुरेश सुर्वे, अशोक बैकर, भूषण जाधव हरेश शिर्के, शंकर दांडेकर, किरण तांबडे, सिताराम गवसकर, प्रदीप गांधी, अनंत शिंदे आदी उपस्थित होते.