
माणगांव – शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणणारे व त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणारे स्वदेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून शालेय मुलांकरीता व आजूबाजूच्या नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते हे शिबिर उप आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या सहकार्याने पार पडले. शिबिरात इंदापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशनी पंदिरकर आणि त्यांचे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरामध्ये १०१ जणांची डोळे, रक्त तपासणी अशाच इतर आरोग्य समस्या तपासण्यात आल्या. डॉ. रोशनी मँडम यांनी योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करून आवश्यक औषधे देखील उपलब्ध करून दिली.
हे शिबीर यशस्वी होण्यासाठी रायगड जिल्हा स्वदेश फाउंडेशनचे डायरेक्टर प्रदीप साठे, मेघना फडके, इंदापूर विभाग अध्यक्ष राजेंद्र वाढवळ, वरिष्ठ समन्वयक राकेश पाखुर्डे, उपसरपंच सुरेश नाडकर, महेश बाबरे, तुकाराम नाडकर, सचिन नाडकर, सुरेश जंगम, प्रकाश जुमारे व ग्राम समिती निवी, इंदापूर आरोग्य उपकेंद्र,आशा सेविका यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या सर्वांच्या मदतीबद्दल ग्रामस्थांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
स्वदेश फाउंडेशनच्या कार्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे. त्यामुळे समाजातील आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण होण्यास मदत होत आहे.