म्हसळा बस स्थानक पासून संत गतीने होत असलेल्या कॉक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात
प्रतिनिधी - संतोष उध्दरकर ( म्हसळा )

म्हसळा – म्हसळा बस स्थानक पासून पुढे नवेनगर ते स्टेट बँक पर्यंत रस्त्याच्या संथ गतीने चाललेल्या कामाबाबत श्री. रवि प्रभा संस्थेच्या वतीने म्हसळा तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र देण्यात आले होते सोबतच अनेक वर्तमान पत्रात याची बातमी प्रसारीत करण्यात आली होती. या पत्राची आणि प्रसारीत झालेल्या बातमीची दखल घेत या रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे.
म्हसळा बस स्थानक पासून पुढे नवेनगर ते स्टेट बँक या काम चालु झाले होते या कामाला दोन महिन्यांहून जास्त वेळ होऊन देखील पन्नास टक्के काम झालेले नव्हते. हे काम संत गतीने सुरु होते. या मुळे स्थानिक नागरीक, प्रवासी, शालेय विद्यार्थी यांना या मार्गाने प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत होता, कोणीही यासाठी बोलायला तयार होत नसताना श्री रविप्रभा मित्र संस्था या संस्थेने पुढाकार घेत म्हसळा तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच म्हसळा पोलीस ठाणे यांना निवेदन २२ / १० /२०२४ रोजी देऊन संत गतीने होत असलेले काम लवकरच पूर्ण व्हावे अशी मागणी केली, नाहीतर सदनशिर मार्गाने अंदोलन करणार असा सज्जड ईशारा देखील देण्यात आला होता.
श्री रविप्रभा मित्र संस्थेच्या पत्राचा तसेच अनेक दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा दणका मिळताच संत गतीने होत असलेल्या कामाला गती मिळाली आहे. लवकरच बस स्थानक परिसरातील काम पूर्ण होणार आहे. श्री. रविप्रभा संस्थेने घेतलेल्या पुढाकाराने पुर्ण होत असलेल्या कामामुळे स्थानिक नागरीक, शालेय विद्यार्थी तसेच प्रवासी यांनी समाधान व्यक्त करत श्री. रविप्रभा संस्थेचे आभार मानले आहेत