शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांच्या ३७ व्या स्मृतीदीन निमित्त भव्य चित्रकला स्पर्धा
प्रतिनिधी - संतोष उध्दरकर. (म्हसळा)

म्हसळा: ” ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या साठी शिक्षण प्रसार” या ध्येयाने प्रेरित होऊन ज्या महामानवाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर या संस्थेची स्थापना केली ते म्हणजे डॉ. बापूजी साळुंखे यांचा ८ ऑगस्ट हा स्मृतिदीन म्हणुन साजरा करण्यात येतो. या स्मृतिदिन निमित्त इंग्लिश स्कुल म्हसळा येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शेख. एम. ए. पर्यवेक्षक गायकवाड. एन. एस. यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना आवाहन करण्यात आले होते. त्या नुसार तालुक्यातील एकुण ५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत पहिली ते बारावी चे एकुण १३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन संस्थेने दिलेल्या विविध विषयांवर चित्रे रेखाटण्यात आली. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन कला शिक्षक बंडगर सर यांनी केले होते व संपूर्ण शिक्षकवर्ग यांच्या सहकार्याने हि स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
या मध्ये अ. ब. क. ड गटनिहाय विजेते स्पर्धक निवडण्यात आले.
प्रथम क्र. कु. जैनी हेमंत कांबळे. ई.४ थी. रा. जि. प. शाळा बनोटी.
प्रथम क्र.कु. स्वराज संतोष उध्दरकर. ई. ७ वी. न्यु ईग्लिश स्कुल, म्हसळा.
प्रथम क्र. कु. ईश्वरी संजय खताते. ई. १० वी. न्यु इंग्लिश स्कुल, म्हसळा.
प्रथम क्र. कु. चांदणी तुकाराम दुरे. ई. ११वी. न्यु इंग्लिश स्कुल, म्हसळा.
व्दितीय क्र. कु.अलिझा इरफान गणतारे. ई. ४ थी. आयडिएल, स्कुल, म्हसळा.
व्दितीय क्र. कु. आदित्य प्रकाश राठोड. ई. ७ वी. न्यु. इंग्लिश स्कुल, म्हसळा.
व्दितीय क्र. कु. निरजा अंकित धोत्रे. ई. ९ वी. न्यु. ईग्लिश स्कुल, म्हसळा.
व्दितीय क्र. कु. मयूर विजय साळवी. ई. ११ वी. न्यु. इंग्लिश स्कुल, म्हसळा.
तृतीय क्र. कु.सिमराह सुहेल बगदादी. ई. ४ थी. आयडिएल स्कुल, म्हसळा
तृतीय क्र. कु. अलिया अतिफ म्हैसकर. ई. ६ वी. आयडिएल स्कुल, म्हसळा.
तृतीय क्र. कु. सहेर तबरेज पेजे. ई. ८ वी. आयडिएल स्कुल, म्हसळा.
तृतीय क्र. कु. अरुणा गुरु पवार. ई. ११ वी. न्यु. इंग्लिश स्कुल, म्हसळा.
या सर्व विजेते स्पर्धक यांचे संस्थेच्या वतीने कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. लवकरच सर्व विजेते विदयार्थ्यांना शाळेच्या वतीने पारितोषिक वितरण करून सन्मानित करण्यात येईल असे कला शिक्षक बंडगर सर यांनी सांगितले.