
नागोठणे – नागोठण्यातील डॉ. राहुल राजीव टेमकर व डॉ. रिचा राजीव टेमकर या दोन भावंडांच्या टेमकर्स डेंटल क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाले. डॉक्टर राहुल व डॉक्टर रिचा ही नागोठणे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या कल्पना टेमकर व व्यवसायिक राजीव टेमकर यांची मुले आहेत.
टेमकर यांच्याच इमारतीत सुरू करण्यात आलेल्या टेमकर्स डेंटल क्लिनिकच्या उद्घाटन कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नरेंद्रशेठ जैन, माजी सदस्य सुरेश म्हात्रे, माजी सदस्य प्रभाकर म्हात्रे, डोलवी येथील उद्योजक अनिल म्हात्रे, मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी, डोलवीचे माजी सरपंच धर्माची म्हात्रे, माजी सरपंच वनिता म्हात्रे आदींसह नागोठण्यातील डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच टेमकर कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.