Join WhatsApp Group
राजकीय

भुषण जाधव यांच्या निवासस्थानी विशेष सभेचे आयोजन

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विजयी चौकारासाठी भिमसैनिक-शिवसैनिक एकत्र

गोरेगांव  विधानसभा निवडणुकीची चाहुल लागल्याने सर्वत्र  पक्षप्रवेश, विविध पक्षांमार्फत वेगवेगळे कार्यक्रम आणि सभांचे आयोजन करण्यात येत आहे अशाच सभेचे आयोजन भितांड मधील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेनेचा उभर्ता कार्यकर्ता, युवा नेतृत्व भुषण संघरत्न जाधव यांनी कार्यसम्राट भरतशेठ गोगावले यांना समर्थन देण्याच्या उद्देशाने व येत्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी माणगांव तालुक्यातील सर्व बौद्ध समाजातील भिमसैनिकांची विशेष सभा दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी भितांड येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती.

 

        सभेच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर उपस्थित भिमसैनिकांनी  आपआपल्या गावांतील समस्याचे निवारण गरिबांचे कैवारी अशी ख्याती लाभलेले  कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी केलेले आहे यापुढे देखील ते करित राहणार यात शंका नाही त्यामुळे आम्हां सर्वांचा पाठिंबा याही वेळेला आमदारकीचा चौकार मारण्यासाठी भरतशेठ यानाच असणार असल्याची ग्वाही तालुक्यातील बौद्धसमाज बांधवानी दिली. 

              या सभेदरम्यान  नागांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. वामन बैकर यांनी आमदार भरतशेठ यांच्या कार्यप्रणालीवर भाष्य करीत आज पर्यंत मतदार संघात एकही गांव असं नाही, वस्ती नाही जिथे भरतशेठ यांनी कोणी सांगितलंय आणि काम झालेलं नाही मग ते गांव किंवा वाडी ही कोणत्याही पक्षाची असो पुढे बोलताना ते म्हणाले की, पंचक्रोशितील भिंताड हे एकमेव गांव असं आहे ज्यांनी भरतशेठ यांना शंभर टक्के मतदान केलेलं आहे आणि अशा गांवाचे नेतृत्व करण्याची संधी आता पक्षाच्यावतीने आपण भुषण जाधव यांना पद देऊन केले पाहिजे.

             या सभेस उपतालुका प्रमुख जगदिश दोशी, गोरेगांव विभाग प्रमुख दिनेश हरवंडकर, नागांव माजी सरपंच वामन बैकर, देवळी सरपंच विनेश डवले, उपसरपंच सयाजी साळवी, देवळी युवा सेना उपविभाग प्रमुख दिपक भोस्तेकर, नागांव माजी सरपंच शंकर शिर्के, भुपेंद्र कासरेकर तसेच भितांड, नागांव, देवळी, वडघर, चिंचवली व इतर गांवातील भिमसैनिक – शिवसैनिक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.     

मतांचा विचार न करता माणसांचा विचार करणारा आमदार म्हणजे भरतशेठ गोगावले

        देवळी सरपंच विनेश डवले हे देखील या सभेत उपस्थित होते त्यांनी यावेळी बोलताना भरतशेठ गोगावले हे आपल्या मतदार संघातील असे आमदार आहेत जे कधीही मतांचा विचार करीत नाही तर ते माणसांचा विचार करतात. त्यांनी कधीही कोणत्याही वाडीचा असा विचार केला नाही किंवा गांवाचा  विचार केला नाही की, हे गांव, वाडी मला  मतदान करीत नाही यांच्या गांवामध्ये मी सुधारणा का करु, मदत का करु त्यांनी प्रत्येक गांव, वस्ती, वाडीमध्ये अनेक प्रकारच्या योजना, निधी देऊन काम केलेले आहे. शिवाय प्रत्येकाला मदत केलेली आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यावेळी आमदार भरत शेठ गोगावले यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करणे आपले कर्तव्य आहे. 

आपल्या मनातला शिवसेनेचा शिलेदार होणार रायगडचा सुभेदार

     माणगांव उप तालुका प्रमुख जगदिश दोषी यांनी कार्यसम्राट भरतशेठ गोगावले यांच्या बद्दल बोलताना आमदारांबद्दल बोलु तेवढं कमी आहे. त्यांच्या कामांबद्दल सर्वांनाच माहित आहे. शेठ गेली तीन टर्म आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. यावेळी देखील आपण त्यांना निवडून आणत विजयाचा चौकार मारणार आहोत तसेच आपले आमदार पालक मंत्री बनणार यात तिळभरसुद्धा  शंका नाही  त्यामुळे  यावेळेला आपल्या मनातील शिवसेनेचा शिलेदार रायगडचा सुभेदार नक्की होणार असं मत त्यांनी या सभेत व्यक्त केले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये