दिघे साहेब आपला पुनर्जन्म व्हावा ही महाराष्ट्राची इच्छा..
एकनाथ शिंदे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार विसरले असल्याची अख्खा महाराष्ट्रखंत

सध्या संपुर्ण महाराष्ट्रात बलात्कार, विनयभंग आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. लहान लहान मुलींवर लैगिंक अत्याचाराच्या घटनांनी हैदोस घातला आहे आणि हे सर्व चालु आहे ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या खंद्या कार्यकर्त्याच्या राज्यकारभारात… एकेकाळी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या एका शब्दावर लेडीज बार फोडणारे एकनाथ शिंदे आज स्वत: राज्यकारभार करताना दिघे साहेबांचे विचार विसरले असल्याची खंत अख्खा महाराष्ट्र व्यक्त करताना दिसत आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी महाराष्ट्राचा राज्यकारभार स्विकारला आणि त्याच्या काही महिन्यातच धर्मवीर नावाचं चित्रपट सर्वांसमोर आणत या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आड स्वत:चीच छब्बी दाखवण्याचा प्रयत्न केला. हा चित्रपट अख्या महाराष्ट्रानी पाहिला आहे. आनंद दिघे साहेब हे टेंबी नाक्यावर जनता दरबार भरवायचे या दरबारात शिवसैनिकांनाच नाही तर सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे, तक्रारीचे, अनेकांवर झालेल्या अन्यायाचे निवारण अगदी चुटकीशीर व्हायचे. करतो, बघतो अशी त्यांची पद्धत नव्हती. न्यायालयाच्या निर्णयाला वेळ लागेल पण दिघे साहेबांचा निर्णय हा तिथल्या तिथे केला जायचा.
धर्मवीर या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दिघे साहेबांकडे काही महिला येऊन ठाण्यामध्ये लेडीज बार चालु असून त्याचा नाहक त्रास त्या बारच्या आजुबाजूला राहणाऱ्या महिलांना होत असल्याची तक्रार करण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांच्या एका शब्दावर एकनाथ शिंदेनी अख्या बार उद्धवस्त केला होता त्यानंतर दिघे साहेबांच्या जनता दरबारात एक वयोवद्ध जोडपे त्यांच्या मुलींने आत्महत्या केल्यानंतर चिठ्ठी आणि त्या मुलीची ओढणी घेऊन झालेल्या अत्याचाराची गोष्ट सांगतात त्या वेळी दिघे साहेबांच्या आदेशावर हेच एकनाथ शिंदे त्या आरोपीला उचलुन साहेबांच्या समोर आणतात..त्या आरोपीला जिवे मारत न्याय दिला जातो मग आता या महाराष्ट्रातल्या असंख्य आई- बहिणींवर अत्याचार होताना हेच एकनाथ शिंदे जे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालत आहेत असं म्हणतात ते आत्ता स्वत: सत्तेत असताना देखील का आनंद दिघे साहेबांचे विचार विसरले? का आई -बहिणींवर बलात्कार, विनयभंग, अत्याचार – हल्ले होताना कठोर निर्णय घेऊ शकत नाही? एकनाथ शिंदे साहेब आता तर आपल्याच ठाणे जिल्ह्यात महिला सुरक्षित नाहीत, आपल्या बदलापुरमधील त्या नराधमाने तर माणुसकीला काळींबा फासण्याचा कळसच केला आहे, एक नाही, दोन नाही तर तीन – तीन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण करुन तुरंगात मस्त मेजवानी तोडत बसला आहे. आज जर दिघे साहेब असते तर सर्वात अगोदर त्यांनी तुम्ही विचारांना विसरलात म्हणून तुम्हालाच तिथल्या तिथं शिक्षा केली असती.
शिंदे साहेब आम्हाला तुम्ही बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन राज्यकारभार करत असल्याचे सांगता, तुम्ही बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे विचार घेऊनच जर महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहात, मग का या नराधमांना शिक्षा व्हायला एवढा वेळ लागत आहे ? का दिघे साहेबांसारखे तिथल्या तिथं निर्णय घेत नाही? का या नराधमांना जागीच ठेचत नाही, शिक्षा होत नाही? शिंदे साहेब महिलांना नको लाडकी बहिण योजना, मुलांना नको लाडका भाऊ योजना आम्हाला पाहिजे आमच्या आई – बहिणींची सुरक्षा… आम्हांला पाहिजे न्याय… आम्हाला पाहिजे ताबडतोब निर्णय… निर्णय आणि निर्णय सोबतच न्याय देणारे…….आणि न्यायच देणारे….धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार
दिघे साहेब खरचं आज तुमच्या निर्णयाची, न्यायाची या महाराष्ट्राला गरज आहे…..आपला पुनर्जन्म व्हावा !
प्रसाद गोरेगांवकर, गोरेगांव
संपादक – रायगड प्रतिबिंब
सुरुवात नव्या पर्वाची…अन्यायाविरुद्ध लढण्याची