शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे कार्यकर्ते नाराज
उबाठा गटाला मदत न करण्याचा बापुसाहेब सोनगिरे यांचा इशारा..

गोरेगांव – सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. आज महाविकास आघाडीकडून महाड विधानसभा मतदार संघा करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहलताई जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु उमेदवारी जाहीर झाल्यापासुन राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) गटाच्या कार्यकर्त्यांना उबाठा गटाने अद्याप विश्वासात घेतला नसल्याने शरद पवार गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत.
उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्यात श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाला उमेदवारी मिळालेली नाही त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात नाराजीचे सुर होते त्यातच महाड विधानसभा मतदार संघातून उबाठा गटाकडून विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार ) गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे सर्वेसर्वा मा. शरदच्ंद्र पवार साहेबांचे खंदे समर्थक तसेच रायगड जिल्ह्याचे नेते बापुसाहेब सोनगिरेन यांनी प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांना फोनवर संपर्क साधत उबाठा गटाकडून विश्वासात घेत नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे कळविले आहे.
या महाड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या कार्यक्रकर्त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून विश्वासात घेतले गेले नाही तर उबाठा गटाला मदत केली जाणार नाही असा थेट इशारा बापुसाहेब सोनगिरे यांनी दिला आहे.