भाजपकडून नवनिर्वाचित खासदार धैर्यशीलदादा पाटील यांची जंगी मिरवणूक
भाजपच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

प्रतिनिधी – किरण बांधणकर (पेण) भाजपाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपाने रायगड जिल्ह्यातील पेण येथील माजी आमदार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यातच काही दिवसांपुर्वी माजी. आमदार धैर्यशिलदादा पाटील यांच्या गळ्यात खासदारपदाची माळ पडल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पेण शहरातून त्यांची जंगी मिरवणुक काढण्यात आली.
पेण तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धैर्यशीलदादा पाटील यांची जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली. पेण शहर रेल्वे स्टेशन पासुन मिरवणुकीस डीजे तसेच ढोल ताश्याच्या गजरात सुरुवात करत भाजप कार्यालय ते पेण नगरपरिषद पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकणी दोन्ही महापुरुषांना पुष्पहार घालण्यात आले व शहरातून मिरवणुक काढण्यात आली या मिरवणुकीची सांगता खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या स्नेह सागर निवास्थानी करण्यात आली.
या मिरवणुकीत पनवेल भाजप आमदार प्रशांत ठाकूर,आमदार रविंद्र पाटील, युवा नेते व भाजप उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील, युवा नेते मंगेश दळवी, सुरेश खैरे, माजी राजिप अध्यक्षा निलिमा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, युवा नेते अनिरुद्ध पाटील, दिनेश शेलार,अनिल खामकर, स्वप्निल म्हात्रे, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, मिलिंद पाटील, राजन पाटील तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून जल्लोष केला.
______