Join WhatsApp Group
राजकीय

गोरेगाव येथे शिवसेना बूथ पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश

प्रतिनिधी – रिजवान मुकादम (पुरार) गोरेगांव येथे गुरुवार दि. २८ ऑगस्ट रोजी रुक्मिणीबेन मंगल कार्यालयात संध्याकाळी कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली  बुथ पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

        बूथ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रमुख मार्गदर्शक आमदार भरतशेठ गोगावले तसेच उपस्थित महाड विधानसभा निरीक्षक विवेक खामकर व इतर अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून अमूल्य मार्गदर्शन करण्यात आले. आमदार भरतशेठ गोगावले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकार कडून जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध नागरिकांना, विद्यार्थी व महिला भगिनींना अनेक प्रकारच्या योजना (निधी), मोफत प्रवासापासून ते मोफत उपचारासाठी मदत केली जात आहे तसेच नागरिकांना अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. महाड मतदारसंघात एक ही गाव वाडी पाडा असा नाही राहिला आहे जिथे शिवसेना पक्षाकडून विकास केला गेला नाही.

           विरोधकांवर टीका करत आमदार गोगावले पुढे म्हणाले की आम्ही विकास कामे करत आहोत परंतु विरोधक गावोगावी धावून गावातील आपआपसात वाद विवाद असल्यास त्यांना चढवायचा काम करत आहेत, अनेक भुलथापा देत आहेत परंतु माझ्या तीन टर्म च्या कारकीर्दीत मी मतदार संघातील सर्व समाजाची विकास कामे पार पाडली आहेत पुढे देखील अविरत करत राहणार आहे याची सर्व जनतेला पूर्णपणे खात्री पटली आहे म्हणून सर्व समाज आता विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाही त्यामुळे सर्व समाजाचा मला चौथ्यांदा पाठिंबा मिळुन मी माझ्या आमदारकीचा चौकार मारणार हे निश्चितच आहे शिवाय मी मंत्री देखील होणार असा खंबीर विश्वास व्यक्त केला.

     आमदार भरत शेठ गोगावले यांच्या भाषणानंतर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले तसेच गोरेगाव, भिंताड , कुमशेत, खरवली, व इतर गावातील वेगवेगळ्या समाजाच्या अनेक पक्षातील असंख्य महिला पुरुष कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

       यावेळी प्रमुख मार्गदर्शक आमदार भरतशेठ गोगावले, महाड विधानसभा निरीक्षक विवेक खामकर, शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, जिल्हा संपर्कप्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती, अनेक विभाग प्रमुख, शहर प्रमुख, शाखाप्रमुख, युवा शहर प्रमुख व असंख्य कार्यकर्ते व महिला हजर होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये