
तळा – तळा शहरातील प्रसिध्द मराठी उद्योजक अशोक आशा सकपाळ यांच्या बिगबॉस मसाज सलूनचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
रोजगारा अभावी तळा शहरासह तालुक्यातून नागरिकांचे स्थलांतर वाढत असताना आपल्यामुळे चार कुटुंब आपल्या गावातच राहून स्वतःसह कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतील या भावनेने शहरात सर्वसोयी सुविधांनी सज्ज असे प्रशस्त सलून टाकण्याचे आमच्या मनात आल्याचे व यासाठी माझी पत्नी आशा सकपाळ हिने पुढाकार घेतल्याचे अशोक सकपाळ यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.
या सलूनच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना कोठेही बाहेर न जाता शहराच्या ठिकाणीच,विविध प्रकारची केसांची हेअरस्टाईल,फूट मसाज,बॉडी मसाज यांसह विविध प्रकारचे मसाज करता येणार आहेत. या बिगबॉस सलूनचे उद्घाटन नगरसेवक रितेश मुंढे यांची कन्या व सकपाळ दाम्पत्यांची नात वैष्णवी मुंढे हिच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, तळा नगरपंचायतींचे नगरसेवक व तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.