काँग्रेसलाच श्रीवर्धन विधानसभेची जागा मिळविण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न करावे – विलास सुर्वे.
प्रतिनिधी - नरेश पाटील ( माणगांव )

माणगाव : रविवारी दि. ०१ सप्टेंबर २०२४ रोजी कॉंग्रेस आय पक्षाच्या कार्यालयात माणगाव येथे कार्यकारीणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १९३ श्रीवर्धन विधान सभेच्या उमेदवारीसाठी आपल्या पक्षालाच जागा मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन माणगांव तालुका अध्यक्ष यांनी केले.
माणगांव येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेस पक्षाकडून कार्यकारीणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभेची सुरुवात विजय तोडणकर यांनी प्रास्ताविक सादर करुन केले. सभेला सुरुवात करण्यापुर्वी श्रीवर्धन येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत तथा नामांकित कार्यकर्ते कै. वाडकर यांना दोन मिनिट शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर चंद्रकांत पाटील यांचे स्वागत सादिक भाई राऊत यांनी पुष्प गुच्छ देवून सन्मानित करण्यात आले सोबतच उपस्थित इतर मान्यवरांचे देखील गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. दरम्यान उपस्थित पदाधिकारी, सदस्य तसेच कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरण, अडचणी यावर मत मांडीत सुचना तसेच निर्णय घेत पक्ष वाढीसाठी संवाद साधून आपआपला अभिप्राय नोंदवला असुन चंद्रकांत पाटील साहेब यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले.
याप्रसंगी विलास सुर्वे बोलताना पुढे म्हणाले आमच्या या विभागातील वरिष्ठांनी आमच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने कुठेतरी हरवल्या सारखे वाटत होते परंतु यातुनही आम्ही पायवाट काढत पक्षाला तारण्यासाठी कोणाचेही सहकार्य नसताना आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आहे. पुढे बोलताना विलास सुर्वे म्हणाले की, संघटना असेल तर मान आहे. दरम्यान काँग्रेसच्या राजवटीत कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या, संजय गांधी निराधार योजना राबविण्यात आल्याने गोर-गरीब जनतेकरीता फायदेशिर ठरली आत्ता यात भर म्हणून खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियान राबविल्याने काँग्रेस पक्षाला पुन्हा वैभव मिळू लागले आहे. काँग्रेस पक्ष हे महात्मा गांधी यांच्या विचार तत्त्वावर चालणारी एक संघटना असून पक्षाला दिशा भुल करणारी लोक संघटनेत नको. कांग्रेस आय. पक्ष वाढीकरीता सर्वांनीच मेहनत करावी, शेवटी बोलताना विलास सुर्वे यांनी सभेस उपस्थित प्रदेश काँग्रेस पक्ष सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांच्याकडे खास मागणी करीत म्हणाले की, १९३ श्रीवर्धन विधान सभा उमेदवारी ही यावेळी कांग्रेस आय. पक्षालाच मिळावी म्हणून आपण पक्ष श्रेष्ठींकडे प्रदेश काँग्रेस कार्यकारणी च्या बैठकी दरम्यान करावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
या वेळी रायगड जिल्हा काँग्रेस चिटणीस डॉ. नरेंद्र सिंह, माणगाव तालुका काँग्रेस पक्ष अध्यक्ष विलास सुर्वे, श्रीवर्धन ता. अध्यक्ष सादिक भाई राऊत, तळा ता. अध्यक्ष शरद भोसले सह इम्तियाज कोकाटे, गणपत गमरे, विजय तोडणकर, सज्जाद सरखोत, वेटू पवार, खेळू गांबिर, महादेव आडीत, प्रकाश पालव, समिर बोरकर, तस्लिम बुरुड, राजा, अबरार काळोखे, शब्बीर इब्राहिम सौ. अनिता महाडिक तसेच पक्षाचे विविध पदावर आसलेल्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.