
पेण – गेली अनेक वर्षे पेण बस स्थानक तसेच बस स्थानका जवळील रिक्षा स्थानकाची दुरावस्था झाली होती त्यामुळे या रिक्षा स्थानकाचे रामेश्र्वर कन्स्ट्रक्शनकडून काही दिवसांपुर्वी कॉंक्रिटीकरण करण्यात होते. याच क्रॉक्रिंटिकरणाचे उद्घाटन रामेश्र्वर कन्स्ट्रक्शन मालक राजू पीचीका आणि पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
पेण बस स्थानक तसेच बस स्थानका जवळील रिक्षा स्थानकाची दुरावस्था झाली होती या बसस्थानकात पडलेल्या खड्यांमुळे तसेच रिक्षा स्थानक खड्ड्यात गेल्याने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे रिक्षा चालकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान पेण बस स्थानकाचे काँक्रीटीकरणाचे काम रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सूरू असताना रिक्षा चालकांनी रिक्षा स्टँड मध्ये देखील काँक्रीटीकरण करून देण्याची मागणी रामेश्र्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पीचिका यांच्याकडे केली होती, पिचिका यांनी त्वरित त्यांची मागणी मान्य करून मोफत काँक्रीटीकरण करून दिले आहे. त्या काँक्रीटीकरणाचे उद्घाटन आज राजू पीचिका आणि पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या हस्ते कऱण्यात आले याप्रसंगी राजू पीचिका यांनी तत्परता दाखवुन स्व: खर्चाने काँक्रीटीकरण करून दिल्याबद्दल उपस्थित रिक्षा चालकांनी संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानले.
यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे संघटक अजय पाटील, अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष योगेश म्हात्रे, कार्याध्यक्ष मोरेश्वर पाटील, खजिनदार शिवदास पाटील, सेक्रेटरी अनिल ठाकुर, सह सेक्रेटरी विलास कांबळे सल्लागार महेश पोरे, पांडुरंग पाटील, सुनिल साळुंखे यांसह सर्व रिक्षा चालक आणि मालक उपस्थित होते.