नदीवर विसर्जनास गेला अन् पाय घसरुन नदीत पाण्याच्या प्रवाहात अडकला
फायर ब्रिगेड आणि पोलिसांच्या मदतीने अजित पाटीलचा जिव वाचला

प्रतिनिधी – किरण बांधणकर ( पेण ) काल देशभरात दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गेली अनेक दिवस पाऊस पडत असल्याने नद्या दुथडी वाहत आहेत अशातच पेण कालेश्री येथील तरुण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत विसर्जन करण्यासाठी गेलेला असता पाय घसरुन नदीपात्रात पडला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला स्थानिक नागरीक आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही.
विसर्जनासाठी गेलेल्या अजित पाटील याचा पाय घसरून नदी पात्रात पडल्याने तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर जवळपास अर्धा किलोमीटर वाहत गेला होता दैव बलवत्नतर म्हणून नदीपात्रात मधोमध असलेल्या एका झाडाला जाऊन तो अडकला होता. अडकल्या नंतर तो मला वाचवा मला वाचवा अशा हाका मारी तो जवळपास 35 ते 40 मिनिटं नदी प्रवाहात उभा होता. नदीकिनाऱ्यांवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीच्या कानावर हा आवाज पडला त्याने क्षणांचाही विलंब न करता पेण पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले. पोलिस आणि अग्मिशामक दल घटनास्थळी पोहचत अग्निशामक दलातील विशाल विलास बामणे व नितेश पांडुरंग पाटील यांनी शर्तीचे प्रयत्न करून अजित पाटील याची सुखरूप सुटका केली.
नदी किनाऱ्यावरुन जाणाऱ्या त्या व्यक्तिच्या समयसुचकतेमुळे आणि अग्निशामक दल व पोलिसांच्या सतर्कतेमुळे एकाचा जीव वाचल्याने तालुक्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे.