Join WhatsApp Group
सामाजिक

ओएनजीसी उरण तर्फे दीक्षाभूमी, नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२४ निमित्त भोजन दान कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – ओएनजीसी उरणद्वारा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिम्मित दीक्षाभूमी, नागपूर येथे सलग १४ व्या वर्षी भोजन दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ११ आणि १२ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित केलेला हा कार्यक्रम बुद्धाच्या शिकवणींच्या तत्त्व – करुणा आणि सामुदायिक सेवा या भावनांशी सुसंगत होता. दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायासह बुद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली, या घटनेची मार्मिक पार्श्वभूमी म्हणून लाखो अनुयायी नागपूर येथे भेट देत असतात.

भोजन दान कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अजनी जंक्शन रेल्वे स्थानकासमोरील स्टॉलवर ओएनजीसी अधिकारी, स्थानिक मान्यवर आणि समाजातील सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या औपचारिक मेळाव्याने झाली. कार्यक्रमासाठी एन अशोक बाबू- हेड सामग्री व्यवस्थापन ओएनजीसी उरण, धीरज उमरेडकर – हेड वित्त विभाग ओएनजीसी मेहसाणा, गौरव पतंगे-मॅनेजर एचआर ओएनजीसी उरण, विष्णु व्हटकर अध्यक्ष – एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन ओएनजीसी उरण, निशिकांत वलादे सेक्रेटरी- एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन ओएनजीसी उरण, विश्वास लोखंडे सीइसी मेंबर – एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन ओएनजीसी उरण आणि इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाअंतर्गत सुमारे १५०० किलो नाश्ता आणि सुमारे ४५०० किलो जेवणाचे पाहुण्यांना वाटप करण्यात आले. दीक्षाभूमीवर आलेल्या २६००० हून अधिक यात्रेकरूंनी ओएनजीसी आयोजित भोजन दान कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम कदम यांच्यासह ३० हून अधिक ओएनजीसी कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र अथक श्रमदान केले. भोजन दानाचा हा कार्यक्रम सामाजिक जबाबदारी आणि समाजाच्या कल्याणासाठी ओएनजीसी च्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. ओएनजीसी उरणच्या उपक्रमाचा उद्देश केवळ पोषण प्रदान करणे नव्हे तर एकता वाढवणे आणि सहानुभूती आणि दयाळूपणाचा संदेश प्रसारित करणे हा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातूून लांब प्रवास करुन थकून आलेल्या गोरगरीब भाविकांंनी पोटभर जेवण मिळाल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि ओएनजीसी चे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवेंद्र कुमार त्रिवेदी प्लांट हेड ओएनजीसी उरण, श्रीमती भावना आठवले हेड एचआर ओएनजीसी उरण आणि मनीष मेहता हेड वित्त विभाग ओएनजीसी उरण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये