लाल बावटा युनियनच्या प्रयत्नाने उरण मधील बांधकाम कामगारांना भांडी वाटप
प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – उरण तालुक्यातील बांधकाम काम करणाऱ्या कामगारांना लाल बावटा बांधकाम कामगार संघटना रायगड यांच्या प्रयत्नाने रायगड जिल्हा बांधकाम कामगार मंडळ तर्फे गृहोपयोगी भांडी वाटप कार्यक्रम चारफाटा उरण येथे आयोजित करण्यात आले. गेली अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून सर्व कागदपत्र जमा करून त्या कामगारांना बांधकाम मंडळात नोंदीत करण्याचे काम लाल बावटा युनियनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
बिगारी, मिस्त्री, गंवडी, सुतार, रंग कामगार, वायरमन व नाका कामगार असे असंख्य कामगारांच्या नोंदणी करण्यात आलेल्या नाहीत त्या कामगारांच्या नोंदीणी केल्यावर या दिवाळीत ५००० बोनस, १ ली ते पदवीधर मुलांना २५०० रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक भत्ता, वैद्यकीय अपघातग्रस्त मयत कामगारांना रुपये ५ लाख मदत, अपंगत्व आल्यास १ लाख रूपये मदत, मातृत्व वेळी व लग्नासाठी मदत असे अनेक लाभ व सुरक्षा किट या कामगारांना मिळणार आहेत. कामगारांचे नाव नोंदणी करण्यासाठी लाल बावटा बांधकाम कामगार रायगड अध्यक्ष काॅ. जयवंत तांडेल यांनी प्रयत्न केले आहेत.
लाल बावटा बांधकाम कामगार संघटना रायगड यांच्या प्रयत्नाने रायगड जिल्हा बांधकाम कामगार मंडळ तर्फे गृहोपयोगी भांडी वाटप कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी आई इन्फ्रास्ट्रक्चरचे नरसु पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले असून कामगार नेते काॅ.भूषण पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन देखील केले.