अशोक दादा साबळे विद्यालयात स्नेह मेळाव्यांचे आयोजन ; विद्यालयाचे माजी विद्यार्थी रमणार जुन्या आठवणीत
माजी विद्यार्थ्यांना मिळणार शाळा-कॉलेजच्या जुन्या आठवणींचा उजाळा

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगांव ) माणगांव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अशोक दादा साबळे विद्यालय (पूर्वीचे माणगाव इंग्लिश स्कूल) तसेच माणगाव ज्युनियर कॉलेज, माणगाव मधून इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करून सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा आमच्या संस्थेच्या व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी दिली.
त्या अनुषंगाने सन 1990 ते 1994, 1995 ते 2000, 2001 ते 2005, 2006 ते 2010, 2011 ते 2015 व 2016 ते 2020 कालावधीत इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रात, देश- विदेशात सध्या कार्यरत असणाऱ्या व शिकत असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी शिक्षकांकडे करावी.
माजी आमदार स्व. लोकनेते अशोक दादा साबळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त डिसेंबर महिन्यात* व लोकनेते अशोक दादा साबळे यांच्या जयंतीनिमित्त 2025 जून महिन्यात अशा प्रकारे तीन वेळा हे स्नेह मेळाव्यांचे प्रयोजन करण्यात आले आहे. या संस्थेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना या निमित्त संस्थाचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या नावाची नोंदणी लवकरात लवकर करावी असे आवाहन स्कूल कमिटी चेअरमन नरेंद्र गायकवाड यांनी केले आहे.
सन 1990 ते 2000 मधील विद्यार्थ्यांनी आर. टी. पवार सर 7744036058, के. आर. पुराणिक मॅडम 7276277582 व आर.एच.पाटील सर 9423382903 सन 2001 ते 2005 मधील विद्यार्थ्यांनी व्ही. एल. धर्मसाले सर 8208282791, व्ही. व्ही. टोळकर मॅडम 9405872019 व व्ही. पी. पाटील सर 9209172200 सन 2006 ते 2010 मधील विद्यार्थ्यांनी बी. व्ही. पवार सर 9028508041, एस. ए. जाधव मॅडम (भोनकर) 8805955655 व बी. एन. बिरादार सर, सन 2011 ते 2015 मधील विद्यार्थ्यांनी ए. वाय. पाटील सर 9822228954, एस. डी. गीते मॅडम 8308622539 व सी. व्ही. अधिकारी सर 9689990299, सन 2016 ते 2020 मधील विद्यार्थ्यांनी भारत पवार सर 9270888664, शिरसाठ सर 8805455029 व जी. पी. साळुंके सर 9028349309 या मोबाईलवर संबंधित विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, चेअरमन अरुण पवार, मुख्याध्यापक धनाजी जाधव सर यांनी केले आहे.