अपूर्वा पवार हिने जिल्हा हातोडा फेक स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक
प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगांव )

माणगाव – माणगाव येथील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माणगाव ज्यूनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कुमारी अपूर्वा संतोष पवार हिने दिनांक १८/१०/२०२४ रोजी जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा आयोजित एच.ओ .सी. स्कूल रसायनी मोहपाडा येथे झालेल्या मैदानी स्पर्धेमध्ये हॅमर थ्रो ( हातोडा फेक ) या क्रीडा प्रकारात १९ वर्ष वयोगट मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
कुमारी अपूर्वा संतोष पोवार १२ वी विज्ञान या शाखेत असून तीची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. तीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, चेअरमन नरेंद्र गायकवाड, अरुण पवार, नितीन बामगुडे मुख्याध्यापक धनाजी जाधव आदी मान्यवर यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अपूर्वा संतोष पवार हि खांदाड येथील असल्याने माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, नगरसेवक प्रशांत साबळे, गाव अध्यक्ष काशिराम पवार, उपाध्यक्ष अनंत पवार, पोलिस पाटील नथुराम पवार,मारुती मालोरे, कृष्णा दिवेकर, दिनेश पवार, बाळा मांजरे, नगरसेवक मनोज पवार, वैभव पवार, रामदास पवार, प्रविण पवार, राजा पवार, विठोबा पालकर, संतोष पालकर, बाळा पवार, राकेश पवार, समिर पवार,रविंद्र पारखे आदी मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.