श्रीवर्धन मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे आपला हमखास विजय होणार – श्री राजाभाऊ ठाकुर
प्रतिनिधी - नरेश पाटील ( माणगांव )

माणगाव – योगा योग पाहा की मी १९३ श्रीवर्धन विधान सभा मतदार संघामध्ये निवडणूकी करीता उतरावे म्हणून पाचही तालुक्यातील अध्यक्षांच्या आग्रहाने एक बाब निदर्शनास येते ती म्हणजे श्रीवर्धन विधान सभा क्षेत्र अंतर्गत येणारे पाच तालुके म्हणजे एका हातावरील पाच बोटे, हाताची पाच बोटे ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळेला वज्रमुठ तयार होते आणि या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या पाचही अध्यक्षांच्या एकमुखी पाठिंब्यामुळे आता महाविकास आघाडीची वज्रमूठ तयार झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय हा नक्की होणार असे प्रतिपादन राजेन्द्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ यांनी केले.
विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर १९३ श्रीवर्धन विधान सभा मतदार संघात कॉग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणुकीत उतरला पाहीजे या उद्देशाने विचार विनिमय करण्याकरिता माणगाव काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत रायगड जिल्ह्यातील काँग्रेस आय पक्षाचे लोकप्रिय नेते तथा नुकताच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघासाठी नेमलेल्या इंडिया आघाडीचे खास निरिक्षक म्हणून काम पाहिलेले श्री राजाभाऊ ठाकुर यांनी निवडणुकीत उतरले पाहीजे, तेच सक्षम उमेदवार असून तेच विजयश्री खेचून आणतील अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
दरम्यान सभेला उद्देशून राजाभाऊ ठाकुर यांनी प्रथम उपस्थित सर्वांचे स्वागत केले. या नंतर बोलताना ते म्हणाले माझे वडील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय मधूकर ठाकुर यांच्या कारकीर्दीत जन संपर्क आणि विकास काम केल्याने व कोणताही भ्रष्टाचार न केल्याने आमच्यावर कधीही डाग पडला नाही आणि त्यांच्या शिकवणी मुळे मीही समाजकारणात उतरलो, माझे वडील हेच माझे राजकीय गुरू म्हणून मी मानतो. संस्कार हे उपजत असतात परंतु वारसा जसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो त्याचप्रमाणे राजकारण, समाजकारणाचे धडे देखील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेले पाहिजेत याकरिता माझा चिरंजीव सम्राटला मी मुद्दामच सोबत घेऊन आलो आहे.
पुढे बोलताना पै. अंतुले साहेब यांचे काम, दांडगा संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व होते म्हणूनच या पूर्वी श्रीवर्धन मतदार संघातून अनेकांनी बॅरिस्टर अंतुले यांचे नाव घेऊन निवडणुकीत विजय प्राप्त केल्याचा खास मुद्धा उपस्थित केला तसेच या पूर्वी महाविकास आघाडीची सत्ता होती आणि आजची जी सत्ता आहे यात निश्चितच फरक जनतेला समजले आहे. महाविकास आघाडीने केलेली कामे निश्चितच चांगली होती. मात्र विरोधक यांना ती बाब पचली नसल्याने उध्दव ठाकरे यांच्या महविकास आघाडीचे सरकार पाडले ज्याचा प्रचंड राग सर्व सामान्य जनतेला आला आहे. मला महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मिळाल्यास जनतेच्या आशिर्वादाने नक्कीच मी निवडणूक लडवेन आपण सर्वांनी एकदिलाने काम करू या म्हणून उपस्थित कार्यकर्ते यांना उद्देशून अवाहन केले.
दरम्यान आपण सर्वांनी मला एकमुखाने पाठिंबा दिल्याने सर्वांचे आभार व्यक्त करून सांगीतले की पहा हा योग कसा आहे की हाताच्या पाचही बोट एकत्र आली की वज्रमुठ बनते आणि या हाताच्या बोटाप्रमाणे पाच तालुक्यातील अध्यक्ष एकत्र येत माझ्यासाठी वज्र मूठ बनल्याने आपला विजय हा निश्चित आहे हे ऐकताच सभागृह राजाभाऊ ठाकुर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा विजय असो पैगंबरवासी बॅरिस्टर अंतुले साहेब अमर रहे अमर रहे अश्या विविध घोषणा देवून राजाभाऊ ठाकुर यांना पक्की साथ देवून त्यांना निवडून आणण्याचा निर्धार जमलेल्या कार्यकर्त्यांनी केला. या वेळी १९३ श्रीवर्धन विधान सभा अंतर्गत येणारे पाच तालुक्यातील काँग्रेस पक्ष अध्यक्ष अनुक्रमे श्रीवर्धन अध्यक्ष सादिक राऊत, म्हसळा मोयिझ शेख, माणगाव विलास सुर्वे, तळा शरद भोसले तसेच रोहा अध्यक्ष सुनिल देशमुख तसेच पक्षाचे वरीष्ठ नेते पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.