गोरेगांव शिवसेना संपर्क कार्यालयात महिला वर्गाची बैठक संपन्न
प्रतिनिधी- पांडुरंग माने ( गोरेगाव )

गोरेगांव – गोरेगाव येथील शिवसेना संपर्क कार्यालयात गोरेगाव महिला विभागिय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या वेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होत्या यावेळी कार्यसम्राट आमदार भरतशेट गोगावले यांना सलग चार वेळा निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला.
बैठकी दरम्यान नव्याने गोरेगांव विभागातील महिलांची पद नियुक्ती करण्यात आली असून सर्व पदाधिकारी महिलांना नियुक्ती पत्र देखील देण्यात आले. नव्याने पक्ष प्रवेश केलेल्या सौ. साक्षी प्रसाद गोरेगांवकर यांना गोरेगांव शहर संघटीका म्हणून पद देण्यात आले तर उपशहर संघटिका पदी सौ. रेश्मा रमेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सौ. साक्षी संतोष अडखळे यांना चिंचलली शाखा प्रमुख तर उप शाखा प्रमुख अमृता अमीर भोसले, व शिवदूत पदी सौ. वृषाली रुपेश गायकवाड, सौ. शिल्पा संदेश गोरेगावकर, सौ. संगीता सचिन पहेलकर, सौ. निकिता रोशन गोरेगावकर, अपर्णा अमीर भोसले या सर्व नव पदाधिकारी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या बैठकिला आमदार भरतशेट गोगावले यांच्या कन्या शीतलताई कदम – गोगावले, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख निलिमाताई घोसाळकर, महिला तालुका प्रमुख अरुणा वाघमारे, उप ता प्रमुख नंदिनी गावडे तसेच विभागतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान शीतलताई तसेच घोसाळकर मॅडम यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.