
प्रतिनिधी – किशोर पितळे ( तळा ) श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे पडघम वाजू लागले असुन महायुतीकडून श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कु. अदिती सुनिल तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय व मित्रपक्षाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करीत उपस्थित होते.
महायुतीच्याा अधिकृत उमेदवार कु. अदिती तटकरे यांनी आपले वडील तसेच प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या आशिर्वादाने श्रीवर्धन येथे आपला उमेदवारी अर्ज असंख्य कार्यकर्ते आणि महायुतीच्या नेत्यांच्या साक्षीने दाखल केला यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ.मा. भरतशेठ गोगावले , मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, सिध्दीविनायक गणपती मंदीर ट्रस्टचे भास्कर (दाजी) विचारे, आ.अनिकेतभाई तटकरे, भाजप जिल्हा संघटक सतिश धारप, रायगड जिल्हाध्यक्ष. मधुकर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, विजय मोरे, विनोद पासिलकर, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, निलम अंतुले यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष, युवक-युवती, रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नागरिकांची असलेली प्रचंड उपस्थिती व उत्साह पाहता यंदाचा विजय श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात इतिहास घडवणारा असेल हा विश्वास दृढ झाला आहे.
२०१९ ला याच वेळी या ठिकाणी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊन प्रचंड मतांनी विजयी झालेल्या कु. अदिती तटकरे यांना ही संधी पुन्हा मिळाली आहे. याप्रसंगी जाहिर सभेत बोलताना अनिकेत तटकरे म्हणाले की, स्व. बॅ. अंतुले, रविंद्र राऊत यांचे स्वप्न पुढे तटकरे साहेबानी पुर्ण केले आता अदिती तुला हे पुर्ण करायचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. अदिती तटकरे म्हणाल्या कि श्रीवर्धन मतदार संघातील मतदारांनी यापूर्वी मला विधान सभेत पाठवले. महिला बालकल्याण मंत्री, राज्यमंत्री पद मिळाले. त्यामुळे अनेक कल्याणकारी योजना तसेच ४६हजार कोटींची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ देता आला. जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित दादा पवार खास.सुनील तटकरे यांचे मार्गदर्शनाखाली विकास कामे केली. मा. अजीत दादांनी या मतदार संघात यावेळी पुन्हा संधी दिली त्यांचे ऋण व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा खास. सुनिल तटकरे, महाड पोलादपूर आमदार तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले, मुश्ताक अंतुले यांनी आशिर्वादपर शुभेच्छा कु. अदिती तटकरे यांना दिल्या.