म्हसळा बस स्थानक पासुन कॉक्रीट रस्त्याचे काम संत गतीने ; सामान्य नागरीकांना नाहक त्रास
रस्ता लवकरच पूर्ण न केल्यास श्री रविप्रभा संस्थेचा आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) म्हसळा बस स्थानक ते नवेनगर स्टेट बँक या कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भुमि पुजन विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्यात करण्यात आले होते, भुमिपुजन होऊन एक महिनाहुन अधिक काळ झाला आहे तरी अध्याप पन्नास टक्केच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे,
या कॉंक्रिटीकरणाचे काम चालु झाल्यापासुन एक साईट देखील पूर्ण झाली नसुन अजुन दुसरी बाजु पूर्ण होणे बाकी आहे, या मुळे प्रवाशी, सामान्य नागरीकांचे तसेच शाळेतील विद्यार्थी यांचे हाल होताना दिसत आहे, या मार्गाने जाताना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते, रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते, यातच विद्यार्थी यांची परिक्षा सुरु असल्याने वेळेवर पोहोचणे कठीण होऊन बसले आहे, त्यातच सकलप बायपासला एस टी थांबा असल्याने प्रवाशांना बायपासला उतरावे लागते, त्यासाठी रिक्षाने बाजार पेठेत येण्यासाठी ६० ते ७० रु मोजावे लागतात हा आर्थिक भुदंड देखील प्रवाशांना नाहक सहन करावा लागत आहे.
ज्या गतीने रस्त्याचे काम होणे अपेक्षित होते त्या प्रमाणे होताना दिसत नाही, प्रवाशांचे, सामान्य नागरीकांचे तसेच विद्यार्थ्याचे हाल होत आहेत व आर्थिक भुदंड देखील सहन करावा लागत आहे, आम्ही कुणा व्यक्ती च्या विरोधात, ज्या पद्धतीने स्थानिक लोक प्रतिनिधी लक्ष देणे अपेक्षित होते पण तसे दिसत नाही म्हणुन या सर्व गोष्टींचा विचार करून श्री रविप्रभा मित्र संस्थेच्या वतीने म्हसळा तहसिल कार्यालय येथे निवेदन देऊन लवकरात लवकर जलद गतीने रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अन्यथा सदनाशिर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा थेट ठेकेदार यांना संस्थेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.