193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी करीता, महाविकास आघाडीचा राजाभाऊ ठाकूर यांना हिरवा कंदील !
रायगड जिल्ह्यातील हजारो समर्थकांच्या उपस्थितीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

प्रतिनिधी – नरेश पाटील ( माणगाव ) १९३ श्रीवर्धन विधान सभा मतदार संघाच्या निवडणुकी करीता महाविकास आघाडीतर्फे सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते राजेंद्र मधुकर ठाकूर ऊर्फ राजाभाऊ ठाकूर आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे खात्रीशीर वृत सुत्रांनी दीले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कमी वेळ असल्याने आज शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी श्रीवर्धन विधान सभा मतदार संघांतर्गत येणार्या पाचही तालुक्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, शहर अध्यक्ष व शेकडो कार्यकर्ते यांच्या शिष्ट मंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुंबई येथील टिळक भवन या कार्यालयात अचानक धडक देऊन काँग्रेस पक्षाचे नामांकित नेते तथा काँग्रेस पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय मधूकर ठाकुर यांचे सुपुत्र श्री. राजेंद्र मधूकर ठाकुर ऊर्फ राजाभाऊ यांना तात्काळ उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी लावून धरली असता या मागणीची लागलीच दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटन व प्रशासन विभागाचे सरचिटणीस श्री नाना गावंडे यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी तात्काळ संपर्क केला, त्याचवेळी तुम्ही अर्ज भरण्याची तयारी करा लवकरच तिसरी यादी प्रसिद्ध होईल असे सुचक विधान वरीष्ठांनी केले असे शिष्ट मंडळाला सांगितल्यावर उपस्थितांनी एकच जल्लोष केल्याचे तसेच सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत श्रीवर्धन येथे राजाभाऊ ठाकूर महाविकास आघाडीतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.